{2023} Yoga Information in Marathi | योगा माहिती मराठी मध्ये 2023

मित्रांनो,आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की Yoga Information in Marathi नक्की वाचा आणि शेर करा.Yoga Information in Marathi

आज कालच्या बिझी शेड्यूल मुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. आपल्या दैनदीन सवयी, खाणे-पिणे, झोपण्याची वेळ या सगळ्या गोष्टीमुळे आपली रोगप्रतिकरशक्ती कमी करतात.

त्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. आपण निरोगी राहावे म्हणून आपल्या बिझी शेड्यूल मधला थोडासा वेळ देऊन आपण योगा केला पाहिजे. आज मी तुम्हाला योगा बद्दल माहिती देणार आहे .

ती तुम्हाला निरोगी राहण्यासाठी नक्कीच उपयुक्त पडेल.“योग” हा शब्द स्वतःच एका संपूर्ण विज्ञानासारखा आहे जो शरीर, मन,आत्मा आणि विश्व एकत्र करतो. Yoga Information in Marathi


योग म्हणजे काय | What is Yoga in Marathi

मित्रांनो, योग ही एक कला आहे तसेच एक शास्त्र आहे. हे एक विज्ञान आहे, कारण ते शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचे व्यावहारिक मार्ग प्रदान करते, ज्यामुळे खोल ध्यान करणे शक्य होते.

योग हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज’ शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणे असा होतो.

काही लोक योग म्हणजे किंवा योगासन म्हणजे शरीराचा व्यायाम समजतात, शरीर ताणने, वाकवणे असे समजतात. परंतु योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून, योग हा मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. तसेच योगा अभ्यास मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.

तर काही तज्ञांच्या मते, ”योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे, तर योग हा भावनात्मक समतोल आणि त्या आनादी आनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.


योगाचा इतिहास | History Of Yoga

मित्रांनो, जरी योगाचा शोध कसा लागला या विषयी कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नसला,  तरीही असे मानले जाते की योगाची उत्पत्ती आपल्या देशात झाली. भारतीय तत्त्वज्ञ पतंजली यांनी योग तत्वज्ञानावर लिहिलेले 2,000 वर्ष जुने “योग सूत्र” हे मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आध्यात्मिकरित्या विकसित होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक मानले जातात.

योग सूत्र हे योगाचे सर्वात प्राचीन लेखी अभिलेख आणि अस्तित्वातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. हे सर्व आधुनिक फॉर्म्युलेशनची चौकट उपलब्ध करते. योग दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. Yoga Information in Marathi

हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो.या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अर्थ वेदातील एका संन्याशाच्या चर्चेनुसार, शारीरिक आसने योगासने म्हणून विकसित होऊ शकतात.


योगा करण्याचे फायदे | Benefits Of  Yoga in Marathi

मित्रांनो, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. Yoga Information in Marathi

1) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी – आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बऱ्याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.

2) ताणतणावपासून मुक्ती – आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.

3) रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी – योगा केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तऱ्हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते.

4) शरीरातील साखरेवर नियंत्रनासाठी – सध्याच्या काळात लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

5) आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी – मित्रांनो, तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावे लागते.

6) रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी – शरीर, मन, आणि आत्मा हे मिळून एक संघी यंत्रणा बनवलेली असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थ पणा मुळे आपल्या मनावर तनाव पडतो. अशावेळी आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. जर ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर आपण नियमित योगा करणे अपेक्षित आहे.

7) मनाची शांतता – आज कालच्या धावपळीच्या आणि ताण-तणावाच्या या जीवनामध्ये शांतता कोणाला नको आहे? आपले मन शांत आणि निसर्ग ठेवण्यासाठी योगा आपल्याला खूप फायदेशीर ठरते.घर बसल्या  योगा करून आपण आपले मन, अंतर्मन शांतता करू शकतो. त्यामुळे नक्की योग करा.


योगा कसा करावा | Method of Doing Yoga in Marathi

मित्रांनो, योग करताना योगाची योग्य पद्धत समजून योग करणे आपल्या शरीराला फायदेशीर ठरू शकते. योगा करण्याच्या महत्त्वाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. Yoga Information in Marathi

1.ध्यान – ध्यान करणे (Meditation) हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रोज काही मिनिटे आपण डोळे झाकून ध्यानाच्या स्थितीत बसल्यास शरीरामध्ये आणि मनामध्ये शक्तीचा संचार होतो. विशेषता सकाळच्यावेळी ध्यान केल्याने मन प्रसन्न आणि एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. मन एकाग्र आणि शांत राहते. त्यामुळे आपला ताण तणाव नाहीसा होतो.

2.भुजंगासन – भुजंगासन ( Bhujangasana ) हे छाती आणि शरीरातील मांसपेशी दूर करण्यासाठी व कंबरेतील तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर प्राणायाम आहे. मंरूदंड संबंधित आजारी व्यक्तींना हे व्यायाम केल्याने खूप फायदा होतो. महिलांना गर्भाशयातील रक्तभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी भुजंगासन आसनाची खूप मदत होते.

3.अर्ध चक्रासन – अर्ध चक्रासन ( Ardha chakrasana ) मुळे ज्या व्यक्तींना व्  मधुमेहा सारखा आजार असतो त्यांना अर्ध चक्रासन उपयुक्त ठरते. तसेच पोटातील चरबी पासून मुक्तता हवी असेल तर त्यावर अर्ध चक्रासन हा उत्कृष्ट उपाय आहे.

4.नाडी शोधन प्राणायाम – नाडी शोधन प्राणायाम ( Anulom Vilo ) हे आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी करायचे असेल तर नाडी शोधन प्राणायाम फायदेशीर ठरते. या प्राणायाम मध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. त्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण राहते. त्यामुळे हा योगाचा प्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो.

5.शलभासन – मित्रांनो, अनेक लोकांना पाठ आणि कमरेचा त्रास होत असतो विशेषतः महिलांना. गरोदर पणा नंतर सहसा सर्वच महिलांना कमरेचा आणि पाठीचा त्रास होतो. अशावेळी शलभासन हे आसन केल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे पाठी चे आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात. शलभासन हे आसन नियमित केल्याने कमरेचा आणि पाठीचा त्रास कायमस्वरूपी नाहीसा होण्यास मदत होते.


योगा कधी करावा  | When To Do YOGA

मित्रांनो, बरेच वेळा योगा सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळचे योगासन बरेच सक्रिय असू शकते आणि पूर्ण सरावाने बनलेले असते. नेहमी सवासना (मृतदेह पोझ) सह समाप्त करा, दिवसाची वेळ असो किंवा हंगामाचा सराव असो. तुम्ही दुपारी वेगळ्या प्रकारचा सराव करणे निवडू शकता. Yoga Information in Marathi

योगा किती वेळ करावा | How much should you do Yoga

मित्रांनो, सुरूवातीला 20 मिनिट्सचा योग करणे हे तुमच्या शरीरासाठी योग्य ठरते. मात्र तुम्ही नियमित योग करत असाल तर अर्धा तासापेक्षा अधिक योग वेळ वाढवू शकता.

अश्या प्रकारे आपण वरती योगा बद्दल माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद !!!

FAQ

1.योगाचे प्रकार किती व कोणते?
मित्रांनो योगाचे सहा प्रकार मानले जातात. (1) राजयोग (2) हठयोग (3) लययोग (4) ज्ञानयोग (5) कर्मयोग व (6) भक्तियोग.

2.योग म्हणजे काय Marathi?
मित्रांनो, योग ही एक कला आहे तसेच एक शास्त्र आहे. हे एक विज्ञान आहे, कारण ते शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचे व्यावहारिक मार्ग प्रदान करते, ज्यामुळे खोल ध्यान करणे शक्य होते.

3.योगा किती वेळ करावा
सुरूवातीला 20 मिनिट्सचा योग करणे हे तुमच्या शरीरासाठी योग्य ठरते. मात्र तुम्ही नियमित योग करत असाल तर अर्धा तासापेक्षा अधिक योग वेळ वाढवू शकता.


(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा : IFSC Code म्हणजे काय मराठी मध्ये , कसा शोधायचा? )

Leave a Comment