How To Download PF Passbook : आपल्या देशातील बऱ्याच खाजगी क्षेत्रातील कंपन्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातुन काही ठरावीक रक्कम त्यांच्या PF खात्यात जमा केली जाते. ती रक्कम कसे चेक करायचे?
How To Download PF Passbook in marathi
मित्रांनो, आपल्या देशातील बराच खाजगी कंपन्या किंवा आस्थापनामध्ये काम करणाऱ्या, कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्याचा निर्वाह निधी कपात करुन त्यांच्या ईपीएफओ कडे जमा केला जातो.
त्याच बरोबर जेव्हा हे कर्मचाऱ्या निवृत्त होतात त्यानंतर ईपीएफओ कडून पेंशन आणि प्रॉविडंट फंड चे रक्कम दिले जाते. आणि बऱ्याच कर्मचार्यांना त्यांच्या खात्यात किती पीएफ जमा झाला, हे सुद्धा माहिती नसतं.
आणि त्याच बरोबर त्यांना पीएफ बैलेंस सुद्धा चेक करता येत नाही. तर तुम्ही आज टेन्शन घेऊ नका पीएफ बैलेंस कसे चेक करायचा हे आम्ही सांगतो. Pf खात्यातील बॅलेन्स पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे ३ पर्याय उपलब्ध आहेत.
- तुमच्याकडे पहिला पर्याय आहे ईपीएफओच्या यूएएन पासबुक या पोर्टलवर जाऊन तिथे यूएएन क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्यानं तुम्ही लॉगीन करुन ज्या संस्थेत काम केलं आहे तो पासबूक क्रमांक सिलेक्ट करुन तुमच्या खात्यात किती रक्कम आहे ते पाहता येईल. ते तुम्ही डाऊनलोड देखील करु शकता. अशा प्रकारे तुम्ही, तुमच्या पी एफ खात्यात किती बॅलन्स आहे चेक करू शकता.
- आणि दुसरा पर्याय आहे तुमच्याकडे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात पहिले उमंग अॅप डाऊनलोड करून घ्यावा लागेल. त्यानंतर अँप ओपन करून त्यामध्ये ई पी एफ पासबुक आणि त्याच्या क्लेम ची स्थिती पाहता येईल त्यासाठी तुम्हाला त्या अँप मध्ये सर्वात पहिले नोंदणी करावी लागेल. या पद्धतीने सुद्धा तुम्ही पी एफ बॅलेन्स चेक करू शकता.
- तिसरा पर्याय आहे तुम्ही पुढे दिलेल्या नंबरवर एसएमएस करून सुद्धा तुमचा पी एफ बॅलन्स चेक करू शकता. ईपीएफओचे सदस्य 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून शिल्लक रक्कम पाहू शकतात. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर मेसेज करुन AN EPFOHO ENG टाइप करुन मेसेज पाठवू शकता. याशिवाय 9966044425 या क्रमांकावर मिसकॉल पीएफ बॅलन्स पाहू शकता. या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकता.
मित्रांनो How To Download PF Passbook ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या जवळच्या मित्राला लगेच शेअर करा आणि आपल्या फॅमिली व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?