Ladaki Bahin Yojana 2024 : बँकेत अकाऊंट नसेल तर भेटेल का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेतून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून सरकार ने काही नियमात बदल केले आहेत.

Ladaki Bahin Yojana 2024

मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) ही सरकारने राबवले आहे या योजनेचा फायदा बऱ्याच लाडक्या बहिणीला होणार आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात ह्या योजनेबद्दल खूपच चर्चा होत आहे. 

 या योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला रक्षाबंधना दिवशी पडणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी एक मोठं गिफ्ट भेटेल सरकारकडून. 

 त्यापूर्वी या योजनेसाठी काही नवीन नियम करण्यात आले आहेत.  तर काही अटी व शर्ती स्थिरता आणण्यात आले आहेत.  या ज्या महिलांच्या बँक खाते नसेल त्यांना हे या योजनेचा लाभ मात्र नक्की मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून योजनेला खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय हे मात्र नक्की.  आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा, यासाठी योजनेचे नियमात काही बदल करण्यात आले त्याच बरोबर बऱ्याच तांत्रिक अडचणी लक्षात घेता हे बदल करण्यात येत आहेत. 

बँकेत अकाउंट नसेल तर पैसे मिळतील का?

महाराष्ट्र सरकारने (Ladaki Bahin Yojana) ही योजना तर आणले त्या योजनेसोबत बऱ्याच महिलांना याचा फायदा मात्र नक्की होतोय त्याचबरोबर ज्या महिलांचं बँक अकाउंट खातं नाहीये त्या महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळेल हा प्रश्न पडतोय कारण बऱ्याच ग्रामीण भागात बँकेची सेवा नसते. 

पण मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते असणे खूप आवश्यक आहे.  परंतु या योजनेत आहे काही नियमात केलेले बदलामुळे आता ज्याचे बँक खाते नाही. त्या महिलांनाही पैसे मिळणार आहेत हे मात्र नक्की झाले आता. 

त्याचबरोबर त्या महिलांना पोस्टात खाते उघडणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टात खाते उघडावे लागेल जर तुम्ही पोस्टात खाते उघडत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही.त्यामुळे लवकरात लवकर पोस्टमध्ये अकाउंट ओपन करा आणि ह्या योजनेचा भरपूर लाभ घ्या. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या माहितीनुसार 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे त्याच बरोबर या योजनेसाठी हजारो महिलांनी अर्ज केले आहेत. त्या सगळ्यांनाच फायदा मात्र नक्कीच होणार.

Ladaki Bahin Yojana eligible

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहेत हे मात्र सर्वात पहिले लक्षात घ्या.

1. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ होईल.

2.  राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना याचा लाभ मात्र नक्की मिळेल.

3. त्याचबरोबर अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असावे लागते.

4.  लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे बँकेत किंवा पोस्टात खाते असणे खूप आवश्यक आहे.असेल तरच या योजनेचा फायदा होईल.

5. त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावा.

Ladaki Bahin Yojana Documents

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *
    • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *
  • अर्जदाराचे हमीपत्र *
  • बँक पासबुक *
  • अर्जदाराचा फोटो *
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला

ऑनलाइन अर्ज Narishakti Doot या ऍप वर करता येईल.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सामान्य माणसाला झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी 100% अनुदान मिळणार : Xerox Machine Subsidy 2024

1 thought on “Ladaki Bahin Yojana 2024 : बँकेत अकाऊंट नसेल तर भेटेल का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ”

Leave a Comment