Maharashtra TAIT Exam 2023 | शिक्षक भरती जाहिरात 65,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की Maharashtra TAIT Exam 2023 नक्की बघा आणि शेर करा .

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे.“शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे. 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे.

तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.


👇👇👇👇

अर्ज येथे करा           येथे क्लिक करा

अर्ज येथे करा           येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात         येथे क्लिक करा


परीक्षेचे शुल्क : Maha TAIT Exam 2023 Application Fees

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-

२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-

३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. Maharashtra TAIT Exam 2023

उमेदवारांची पात्रता TAIT Exam 2023 | Educational Criteria For Maharashtra TAIT Exam 2023

१ भारतीय नागरीकत्व Maharashtra TAIT Exam 2023

२ वय मर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वय मर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.

३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७ / टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ / टीएनटी-०१, दि. १०/ ११ / २०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणार्‍या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणार्‍या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment