Sukanya Samriddhi Yojana In Marathi | मुलीच्या भविष्याची चिंता सोडा सुकन्या योजनेमध्ये 5,54,206 रूपये मिळतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana In Marathi | जेवढ्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुमच्या मुलीसाठी जास्त फायदा आहे . 

Table of Contents

Sukanya Samriddhi Yojana In Marathi 

मित्रांनो केंद्र सरकारची ही सुकन्या समृद्धी योजना , ही योजना फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. आणि पालकांना मुलीचं लग्न आणि शिक्षण यासारख्या भविष्याच्या दृष्टीने पैसे गोळा करण्यात मदतीचा हात ,सुकन्या समृद्धी योजना हे या योजनेचं मुखे वैशिष्ट्यं आहे. 

ही योजना केंद्र सरकारने आपल्या देशयातील मुलीनं साठी 2 डिसेंबर 2014 रोजी सुरू केली. आणि आतापर्यंत बऱ्याच मुलींना ह्या योजनेचा फायदा झालाय. आणि तुम्ही सुद्धा आता ह्या योजनाचा नक्कीच फायदा करून घ्या

आणि आपल्या देशातील मुलींचं भविष्य घडवण्यासाठी केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana In Marathi ) सुरु करण्यात आली आहे. 

या योजनेची माहिती आणि त्यात गुंतवणूक कशी करावी यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि ही माहिती, आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा. 

हे मात्र लक्षात घ्या की सुकन्या समृद्धी योजना फक्त योजना मुलींसाठीच आहे. तुम्ही मुलीचे पालक असाल आणि तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपर्यंत असेल तर त्याचबरोबर या योजनेत किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतील. म्हणजे जर तुम्हाला अडीचशे रुपये पासून दीड लाखापर्यंत मंथली, गुंतवणूक करता येते ते तुम्ही तुमच्या बजेट नुसार गुंतवणूक करा.

आणि सुकन्या समृद्धी योजनेत, तुम्हाला 15 वर्ष सतत गुंतवणूक करावी लागेल आणि योजना 21 वर्षांनी तुम्हाला खूप चांगला रिटर्न्स मिळेल. 

तुम्ही या योजनेत दर महिन्याला 1000 रुपये गुंतवले तर तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता. सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8.2%टक्के व्याज आहे.त्यामुळे तुम्ही नक्कीच गुंतवणूक करा त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला भेटेल.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा किंवा कुठे अर्ज करायचा तर मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका ही सर्व माहिती पुढे दिली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा मगच अर्ज करा.

 जर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे खाद्य उघडू शकता आणि गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावं लागेल.

आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना, खाते उघडू शकता.  आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे मात्र लक्षात ठेवा की तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे ह्याची खात्री करूनच तुम्ही अकाऊंट ओपन करायला जावा. 

सुकन्या समृद्धी योजना मध्ये किती व्याज मिळेल? 

मित्रांनो,ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी सरकार सुकन्या समृद्धी योजनेवर (Sukanya Samriddhi Yojana In Marathi) 8.2%टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर या सुकन्या समृद्धी योजनेत, प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवसाच्या शेवटी आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेदरम्यानच्या किमान शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याज जमा केले जाते. हे मात्रा नक्की 

सुकन्या समृद्धी योजने मध्ये खाते कधी बंद होते?

तसे तर सुकन्या समृद्धी योजने (Sukanya Samriddhi Yojana In Marathi ) मध्ये जेव्हा मुली जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते, किंवा तिचं लग्न होत अशावेळी सुकन्या सुकन्या समृद्ध योजनेचा खात बंद केला जातं. जर समजा खातेधारकाचा मृत्यू झाल्यास सुद्धा खाते बंद करण्यात येते. 

सुकन्या समृद्धी योजनेमधून पैसे कसे काढता येतात ? 

तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेमधून पैसे कधी आणि कसे काढता येतात. सर्वात पहिले तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावरच सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे काढता येतात हे मात्र लक्षात ठेवा.

आणि त्याचबरोबर आपल्या मुलीचं वय 18 वर्षे झाल्यावर मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रकमेच्या 50% रक्कम काढता येते.

त्याच बरोबर वर्षातुन एकदा एकर कमी किंवा हप्त त्यामध्ये पैसे काढता येतात पण यामध्ये अनेक अटी व नियम लागू आहेत जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर त्यांच्या सर्वात पहिले अटी व नियम वाचूनच पैसे काढा नाहीतर तुमचा खूप मोठा नुकसान होईल. 

या योजनेत महिन्याला १००० रुपये जमा केल्यावर तुम्हाला किती परतावा मिळतोय वाचा सविस्तर 

तर मित्रांनो जर तुमच्या मुलीचं नाव खाते उघडले आणि तुम्ही दर महिन्याला या Sukanya Samriddhi Yojana In Marathi मध्ये १००० रुपये गुंतवले तर तुम्हाला १५ वर्षे सतत गुंतवणूक करावे लागतेय हे मात्र लक्षात ठेवूनच तुम्ही महिन्याला 1000 रुपये भरायला सुरुवात करा.

जर तुम्ही हे गुंतवणूक चालू ठेवली तर प्रती महिन्यानुसार 1000 रुपये याचा अर्थ तुम्ही दरवर्षी 12 हजार रुपयांचे गुंतवणूक करता आणि हेच १५ वर्षांत तुम्ही ३ लाख 74 हजार 206 रुपये गुंतवणूक कराल.

त्याचबरोबर तुम्हाला या योजनेत सध्या 8.1% चा चांगला परतावा दिला जात आहे म्हणजे जर तुम्ही पंधरा वर्षे गुंतवणूक केली तर त्यानंतर 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीचे नावावर पैसे काढू शकता. म्हणजे याचा अर्थ एकूण रक्कम तुमची 5 लाख 54 हजार 206 रुपये असेल.

आणि जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसला व्हिजिट नक्की करा. आणि संपूर्ण माहिती घेऊनच या योजनांमध्ये गुंतवणुक नक्की करा. 

सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे 

1) SSY खाते उघडण्याचा फॉर्म. 

२) लाभार्थीचे (मुलीचे) जन्म प्रमाणपत्र. 

3) पालक किंवा पालकांचा पत्ता पुरावा. 

4) पालक किंवा पालकांचा ओळखपत्र पुरावा. 

5) फॉर्म सबमिट करणे: एकदा SSY खाते उघडण्याचा फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटो 

जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा (Sukanya Samriddhi Yojana In Marathi ) खाते ओपन करणारा असाल तर या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट पहिले घेऊनच पोस्ट ऑफिस ला नक्की जावा. आणि हे कामाचे माहिती आपल्या जवळचा मित्राला नक्की शेअर करा. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : ladli lakshmi yojana | मुलींसाठी सरकार देते एक लाख रुपये ची मदत काय आहे योजना? वाचा सविस्तर

1 thought on “Sukanya Samriddhi Yojana In Marathi | मुलीच्या भविष्याची चिंता सोडा सुकन्या योजनेमध्ये 5,54,206 रूपये मिळतात.”

Leave a Comment