Ayushman Bharat Yojana : आता तुम्ही हॉस्पिटल ला एकही रुपये न देता या योजनेमार्फत तुम्ही मोफत 5 लाखापर्यंत उपचार करून घेऊ शकता. ही कोणती योजना ?
Ayushman Bharat Yojana Application Process
मित्रांनो केंद्रसरकार आपल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आणि त्या योजनांचा नागरिकांना खूप म्हणजे खूपच जास्त फायदा झाला आहे. त्यातीलच सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना 1500 रुपये भेटत असतात.
तसेच एक योजना केंद्र सरकार आता नागरीकांसाठी राबवत आहे. त्या योजनेचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना , या आयुष्यमान भारत योजनांतर्गत आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देखील या योजने मध्ये मोफत उपचार घेऊ शकतात.
तसेच आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपल्या देशातील नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या कडे या योजनेसाठी लागणारे आयुष्यमान कार्ड असणं गरजेचं आहे हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होऊ शकतो.
आणि जर तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Bharat Yojana) हे काढायचं असेल तर तर ते कसं काढायचं त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात आणि अर्ज कुठे करावी लागत या सगळ्यांची माहिती खाली दिली आहे त्यामुळे माहिती संपूर्ण वाचूनच अप्लाय करा.
आयुष्यमान भारत योजना चा लाभ कोण घेऊ शकतात?
मित्रांनो आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) या योजनेसाठी,आपल्या देशातील अशा लोकांना आरोग्य सुरक्षा कवच प्रदान करते, ज्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे. म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा होतो.
याव्यतिरिक्त या योजनेचा लाभ गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना दिला जातो. म्हणजे खरं ज्यांची परिस्थिती दुर्मिळ आहे जे हॉस्पिटलला पैसे भरू शकत नाहीत अशांसाठी ही योजना आहे.
त्याच बरोबर आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही निकष जारी केले आहेत. या नियमांनुसार ज्या कुटुंबाच्या घराच्या भिंती व छताची बांधणी कच्च्या स्वरुपात आहे, ग्रामीण भागातील अशाच कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळेल.
त्या बरोबरच आदिवासी एससी/एसटी, भूमिहीन कुटुंब, रोजंदारी मजूर किंवा ज्या कुटुंबामध्ये एखादा दिव्यांग सदस्य आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये शारीरिकदृष्ट्या कोणीही सक्षम प्रौढ सदस्य नाही; अशा कुटुंबांनाही आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेमध्ये आणण्यात आले आहे. ते नागरिक पण ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
जर तुम्हाला आयुष्यमान भारत योजना साठी तुम्ही पात्रा आहात का नाही? याची माहिती हवी असेल तर तुम्ही या 14555 क्रमांकावर कॉल करून किंवा आयुष्मान अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्या अँप मधून सुद्धा ही माहिती मिळू शकता.
आयुष्यमान भारत योजनाचे नक्की फायदे काय आहेत : Ayushman Bharat Yojana Benefits
- सर्वात पहिले म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल होताना तुम्हाला आयुष्मान कार्ड दाखवणे गरजेचे आहे. त्या कार्ड वरच तुमची योजना लागू होते.
- त्या नंतर तुमच्या उपचारांच्या खर्चासाठी तुम्हाला कागदपत्र किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता लागत नाही.
- यानुसार योजनेअंतर्गत कागदपत्र तसेच रोखरहित औषधोपचार केले जाऊ शकतात.
- त्याच बरोबर या योजनेमध्ये तुम्ही सरकारी तसेच सूचीबद्ध खासगी हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता. आणि या योजना चा फायदा घेऊ शकता.
- वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त वाहतुकीसाठी होणारा खर्चाचाही या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या योजनेचा नक्कीच फायदा घ्या.
आयुष्मान भारत योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?
मित्रानो आपल्यात देशातील नागरिकांना आयुष्यमान भारत या योजनाचा खूप लाभ घेतला आहे. आतापर्यंत आपल्या देशातील आयुष्यमान भारत योजना साठी ३५ कोटी लोकांनी अर्ज केले आहेत.
त्याचबरोबर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचे वैद्यकीय कव्हरेज मिळते. म्हणजे तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार करता येते या योजनेमधून या आयुष्मान भारत योजनेत सर्व वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.
आणि जर तुम्ही इतर कोणत्याही प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्सचा लाभ घेत असाल तरीही या योजनेअंतर्गत ५ लाखांचे कव्हरेज मिळवू शकतात.त्यामुळे तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचा नक्कीच लाभ घ्या.
आणि Ayushman Bharat Yojana ही महत्वाची माहिती आपल्या जवळच्या मित्राला आणि आपल्या फॅमिली WhatsApp ग्रुप वरती नक्की शेअर करा.
आयुष्मान भारत योजने साठी लागणारी कागदपत्र ? Ayushman Bharat Yojana Document
आयुष्यमान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana) लागणारे कागदपत्र हे पुढीलप्रमाणे आहेत हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी अर्ज करावा आणि या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- अॅड्रेस प्रूफ
हे पण वाचा : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ! सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये होणार जमा : Ladki Bahin Yojana third installment
आयुष्मान भारत योजनेत अर्ज कसा करायचा?
मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यमान भारत योजने साठी अर्ज करायचा असेल तर आम्ही काही स्टेप्स तुम्हाला सांगत आहोत त्या पद्धतीनं तुम्ही करा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, माहिती संपूर्ण वाचुनच योजने साठी अर्ज करा.
- सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान भारतच्या अधिकृत वेबसाइट https://abdm.gov.in वर जावे लागेल.
- त्या नंतर तुमच्या पुढे ते वेबसाईट ओपन होईल आणि तिथे ज्या व्यक्तीला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड PMJAY कियोस्कवर वेरिफाय करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
- यामध्ये तुम्ही AB-PMJAY आयडीसह तुमचे ई-कार्ड प्रिंट करु शकतात.
- अशा पद्धतीने तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड साठी अप्लाय करू शकता.
एकाच कुटुंबातील किती लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात?
मित्रांनो तुम्हाला पण हा प्रश्न नक्कीच पडला असेल की या योजनेचा लाभ कुटुंबातील किती व्यक्तींना भेटू शकतो तर त्याचे उत्तर तुम्हाला पुढे भेटेल त्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.
या आयुष्मान भारत योजनेत एकाच कुटुंबातील सर्व सदस्यदेखील लाभ घेऊ शकतात. ज्या लोकांना खरंच गरज आहे ते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीसुद्धा या योजनेचा नक्कीच लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रालाही महत्वाची माहिती लगेच शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
1 thought on “फ्रीमध्ये 5 लाखांपर्यंत उपचार करुन घ्या पण अर्ज कुठे करायचा ? वाचा सविस्तर माहिती : Ayushman Bharat Yojana”