बापरे कामगारांनाही 2 लाख अपघात विमा-ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना मिळणार लेबरकार्ड | E Shram Card yojana Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की E Shram Card yojana Maharashtra म्हणजे बापरे कामगारांनाही 2 लाख अपघात विमा-ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना मिळणार लेबरकार्ड.

ई श्रम कार्ड प्रधान मंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) ही भारत सरकारची एक योजना आहे ज्याने असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे, म्हणजे असंघटित कामगारांना वृद्धापकाळापासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी.

जे उमेदवार घर-आधारित कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील मजुरीचे कामगार आहेत ते ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.

ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना मिळणार लेबरकार्ड

  • यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घरकामगार, स्थानिक रोजंदारीवर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.
  • ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना सर्व नोंदणीकृत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जात आहे.
  • या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
  • असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या फायद्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ई- श्रम कार्ड (श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे. हे कार्ड आधारशी जोडलेले असणार आहे. त्यात कामगारांचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य संच आणि कुटुंब आदी तपशील असणार आहे. जेणेकरून त्यांच्या रोजगार क्षमतेचा अधिक वापर करता येईल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल.
  • या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, मजुरांना विशिष्ट क्रमांकासह १२ अंकी लेबर कार्ड दिले जात आहे.
    E Shram Card yojana Maharashtra

कशी आहे योजना

  • नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाला, तर प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेंतर्गत वारसदारांना दोन लाखांचा विमा मिळतो.
  • अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेंतर्गत दोन लाखांची मदत, तर अपंगत्व आल्यास १ लाखाची मदत मिळते.
  • लाभार्थी वयाची ६० वर्षे पूर्ण करताच अटल पेन्शन योजनेंतर्गत दर महिना एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते
    . E Shram Card yojana Maharashtra

कागदपत्रे काय लागणार योजना साठी

  • श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक,
  • आधार लिंक केलेला मोबाइल नंबर,
  • आयएफएससी कोडसह बचत बँक खाते क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
    E Shram Card yojana Maharashtra

कमीत कमी २ लाखांपर्यंत मोफत विमा

  • नोंदणीकृत कामगाराचा प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा एक वर्षाचा वार्षिक हप्ता केंद्र सरकार भरणार आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांचे अपघात विमा कवच कामगारांना मिळणार आहे.
  • संकेतस्थळावर करा नोंदणी -असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई- श्रम कार्ड काढणे शक्य व्हावे, यासाठी ई- श्रम पोर्टल विकसित करण्यात आले आहे. https://eshram.gov.in/ या पोर्टलवर कामगारांना नोंदणी करता येते.E Shram Card yojana Maharashtra

ई-श्रम कार्ड काढा आणि रोजगार मिळवा पुढील प्रमाणे

  • मित्रांनो ई-श्रम कार्ड 2022 भारत सरकारने संपूर्ण भारतातील बेरोजगार मजूर कुटुंबांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे गरीब कामगार कुटुंबांना एक हजार रुपये मासिक भत्ता आणि दोन लाख रुपयांचा अपघात विमा देण्याची घोषणा केली आहे.तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट eshram.gov.in द्वारे ई-श्रम कार्ड ऑनलाइन नोंदणी करू शकता. त्या संबंधित संपूर्ण माहिती खाली दिली आहे
  • ज्या उमेदवारांनी ई-श्रम कार्ड नोंदणी 2022 पूर्ण केली आहे. ते भारतीय मजूर खालील लिंकद्वारे ई-श्रम कार्ड पेमेंट स्थिती तपासू शकतात. ई-श्रम कार्डशी संबंधित संपूर्ण माहिती या लेखात पाहता येईल. E Shram Card yojana Maharashtra

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment