क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | Credit Card Information in Marathi 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो क्रेडिट कार्ड (Credit Card) म्हणजे काय? हा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. ही संकल्पना आता काही नवीन राहिलेली नाही. पण क्रेडिट कार्डचे कामकाज कसे चालते, त्याचे फायदे-तोटे काय त्याच बरोबर कसे यूज करायच, याबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आजच्या लेखात ही माहिती  सोप्या शब्दांत समजून घेऊया.

Credit Card Information in Marathi

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की बँक आपल्या खातेधारकांना वित्तीय देवाणघेवाण कमी वेळेत करता यावे यासाठी इंटरनेट बँकिंग, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, चेक बुक, ई अश्या सुविधा प्रदान करत असते. (Credit Card Information in Marathi 2022) खातेधारकांना जास्तीत जास्त फायदा होईल अशी सुविधा बँक प्रदान करत असतात.

बँक खातेधारकांसाठी अनेक सुविधा प्रदान करतात, त्यात एक सुविधा अशी असते की बँक खातेदारांना उधारी देते. होय, बँक आपल्या कस्टमर ला उधारी देते या सुविधेला क्रेडिट कार्डच्या मदतीने चालवले जाते. बँकेने दिलेली हि उधारी फेडण्यासाठी कस्टमर ला ठराविक वेळ दिला जातो. क्रेडिट कार्डचा वापर करून ही सुविधा पुरवली जाते. ही सुविधा नेमकी काय असते हे जाणून घेणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. 

Table of Contents

क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी 2023 | Credit Card Information in Marathi 2023

क्रेडिट कार्डमाहिती
वयोमर्यादा18 वर्ष
व्याज दर2.5% ते 3.5 % पर मंथ
उत्पन्न1 लाख ते 3 लाख
क्रेडिट कार्डचे प्रकाररिवॉर्ड, कॅशबॅक, खरेदी, लाइफस्टाइल इत्यादी

क्रेडिट कार्ड म्हणजे काय संपूर्ण माहिती | What is a credit card full information?

मित्रांनो भौतिक स्वरूपात हे एटीएम कार्ड अर्थात Debit Card सारखे दिसणारे एक कार्ड आहे. क्रेडिट कार्ड हे वित्तीय संस्थांद्वारे जारी केलेले एक पातळ प्लास्टिक कार्ड आहे जे तुम्हाला ठरलेल्या ठराविक वेळेसाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देते.

थोडक्यात, हे कार्ड तुम्हाला बँकेकडून ठराविक वेळेसाठी उधार पैसे उपलब्ध करून देते, जे तुम्हाला ठरलेल्या मुदत वेळेत भरावे लागतात अन्यथा व्याज भरणी करावी लागते.

Credit Card चे हे बिल भरण्यासाठी बँकेकडून पूर्व-निर्धारित वेळ असतो आणि त्यात रकमेची परतफेड करावी लागते. Credit Card प्रत्येकाला बँक देत नाही, यासाठी बँक व्यक्तीची सर्व आर्थिक माहिती घेते,

सामान्य व्यक्तीला क्रेडिट कार्ड मिळणे कठीण असते परंतु नोकरी वर असलेल्या व्यक्तीला सहज दिले जाते. समोरचा व्यक्ती क्रेडिट कार्ड चे बिल भरण्यास आर्थिक द्रुष्ट्या सक्षम असेल तरच हे कार्ड दिले जाते.

तुमच्या सेविंग खात्यात रक्कम नसेल तरीही तुम्ही क्रेडिट कार्डच्या Credit Card Information in Marathi मदतीने पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डची रक्कम मर्यादा निश्चित असते आणि तुम्ही या कार्डाच्या मदतीने कोणत्याही खरेदीसाठी केवळ ठराविक रक्कम खर्च करू शकता.

Credit Card हे बँकेने दिलेले कर्ज आहे ज्यातून तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला हे कर्ज दर महिन्याला बँकेला परत करावे लागेल.

क्रेडिट कार्ड चे फायदे | Advantages of credit card

● जेव्हा आपल्या बँक अकाउंटवर आपल्याला कुठलीही वस्तु खरेदी करता येईल इतकी रक्कम शिल्लक नसते.तेव्हा क्रेडिट कार्ड सुविधा वापरून आपण ती वस्तु तत्काळ खरेदी करू शकतो.

● क्रेडिट कार्ड ह्या सुविधेचा वापर करून आपण कुठलीही महाग वस्तु देखील खरेदी करू शकतो ते ही आपल्या बँक खात्यात पुरेशी कँश उपलब्ध नसताना.

● क्रेडिट कार्डचा वापर करून आपल्याला लगेच जी वस्तु खरेदी करायचे आपण ती खरेदी करू शकतो.

● क्रेडिट कार्ड दवारे शाँपिंग खरेदी केल्यास आपणास भरपुर डिस्काऊंट मिळतो अणि रिवाँर्डस पाँईण्ट देखील प्राप्त होत असतात.ज्याचा उपयोग आपणास नंतरून शाँपिंग करताना होतो.

● क्रेडिट कार्ड वापरून आपणास एखादी वस्तु ई एम आयवर खरेदी करता येत असते.

● क्रेडिट कार्ड दवारे शाँपिंग करण्याचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे आपण कोणती वस्तू कधी खरेदी केली? त्यात किती रूपये खर्च झाले?याची सर्व नोंद केलेले एक बिलशीट आपल्याला देण्यात येते.

● जर एखाद्या व्यक्तीने क्रेडीट कार्ड दवारे अशी वस्तु खरेदी केली जिची किंमत पन्नास हजारपेक्षा अधिक आहे तर त्या व्यक्तीस क्रेडिट कार्डची अँन्युअल चार्ज फी भरावी लागत नाही.त्याला ते माफ केले जाते.

क्रेडिट कार्डचे संपूर्ण तोटे |Complete Disadvantages of Credit Cards

●     जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी वस्तु खरेदी केलेली असेल तर आपल्याला ते पैसे लवकरात लवकर बँकेला फेडणे देखील खुप गरजेचे असते. नाहीतर बँक आपल्याकडुन त्याचे व्याज देखील वसुल करत असते. ज्याचे प्रमाण हे खुप अधिक प्रमाणात असते.

●     आपल्या क्रेडिट कार्डचे लिमिट जेवढे असते तेवढा दर वर्षी आपल्याला वार्षिक चार्ज बँकेला द्यावा लागत असतो.

●     क्रेडिट कार्डवर बँक आपल्याला अनेक फी तसेच चार्ज देखील आकारत असते जे बँक आपल्याला कधीच सांगत नसते. ज्यामुळे आपण कर्जाच्या जाळयात फसत असतो.

●     क्रेडिट कार्डचे बील फेडण्यासाठी बँक आपल्याला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना देत नसते आणि मग बील भरण्याची लास्ट डेट माहीत नसल्यामुळे बील भरायला आपल्याला उशिर होतो. मग त्यासाठी बँक आपल्याकडुन लेट फी देखील वसुल करत असते.

●     क्रेडिट कार्ड आँटोमोडला जर आपण ठेवले तर आपल्या नकळत आपल्या खात्यातुन पैसे दरमहा तसेच दरसाल कपात केले जात असतात. म्हणुन असे म्हटले जाते की आपण आपल्या क्रेडिट कार्डचा पिन अपडेट करत राहायला हवा.

क्रेडिट कार्डचे संपूर्ण प्रकार | All types of credit cards

मित्रांनो क्रेडिट कार्ड (Credit Card) अनेक ठिकाणी वापरले जातात. एअरलाइन तिकीट, रेल्वे तिकीट बुकिंग, कॅब बुकिंग, ई अश्या अनेक कार्यांसाठी हे कार्ड वापरले जाते. यामुळे या कार्ड चे काही प्रकार पडतात जे विशिष्ट कार्यांसाठी बनवलेले आहेत. तर चला आता Types of Credit Card पाहुयात.

1) ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड | Travel Credit Card

हे कार्ड अश्या लोकांसाठी आहे ज्यांना विविध ठिकाणी फिरायला जाण्यास आवड आहे. Travel Tickets साठी या कार्ड वर डिस्काउंट जातो. रेल्वे बुकिंग, एअरलाइन बुकिंग, बस बुकिंग, ई अश्या बुकिंग साठी जर या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर यात तुम्हाला ठराविक प्रमाणात डिस्काउंट, कॅशबॅक, रिडीम पॉईंट मिळतात.

2) इंधन क्रेडिट कार्ड | Fuel Credit Card

वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे क्रेडिट कार्ड परवडते. वाहनात इंधन भरताना तुम्ही जर Fuel Credit Card वरून पेमेंट केले तर तुम्हाला कॅशबॅक, रिडीम पॉईंट मिळतात. पेट्रोल पंप सुद्धा क्रेडिट कार्ड धारकांसाठी Offers लावतात, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

3) खरेदी क्रेडिट कार्ड | Shopping Credit Card

मित्रांनो शॉपिंग प्रेमींसाठी हे खास कार्ड आहे. ज्यांना शॉपिंग करण्याची खूप आवड आहे अश्या लोकांनी हे कार्ड घावे. यात शॉपिंग साठी तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट, कॅशबॅक, रिडीम पॉईंट दिले जातात. यासोबतच वोउचर सुद्धा असतात जे आपण नंतर वापरू शकता.

4) सुरक्षित क्रेडिट कार्ड | Secured Credit Card

मित्रांनो ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कॉर खराब आहे किंवा खराब होण्याची शक्यता आहे त्यांनी हे कार्ड वापरावे. हे वापरल्यावर तुमचा क्रेडिट स्कॉर कमी होत नाही, यामुळे तुम्हाला लवकर कर्ज लागत असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता जास्त राहते.

5) शिल्लक हस्तांतरण क्रेडिट कार्ड | Balance Transfer Credit Card

मित्रांनो आपल्याला जर आपले क्रेडिट ट्रान्सफर करायचे असेल तर हे कार्ड लागते. या क्रेडिट कार्ड वर व्याज आणि पेनल्टी लागणार नाही कारण क्रेडिट ची परतफेड करण्यासाठी 6 ते 21 महिने वेळ दिला जातो. एकदा क्रेडिट ट्रान्सफर करण्यासाठी One Time Balance Transfer Fee घेतली जाते जी ट्रान्सफर करावयाच्या रकमेच्या 5% पर्यंत असू शकते.

क्रेडिट कार्ड कश्या प्रकारे वापरावे | How to use a credit card

मित्रांनो काही लोकांचा असा गैर समज आहे की, क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास जास्त खर्च येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल आणि तुम्हाला अनेक फायदेही होतील.

क्रेडिट कार्ड नफ्याचा सौदा | Credit Card Profit Deal

मित्रांनो काही लोकांसाठी, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे एखाद्या समस्येपेक्षा कमी नाही. क्रेडीट कार्डचे पेमेंट एक दिवस उशिरा झाले तर दंड भरावा लागेल, अशी भीती त्यांना वाटते. पण ते वापरताना तुम्हाला थोडी समज असेल तर तुमच्यासाठी हा एक फायदेशीर सौदा आहे. याठिकाणी आम्ही तुम्हाला अशा 5 पद्धती सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्हाला पैसे वाचवण्याव्यतिरिक्त अनेक फायदे मिळतील.

ई-कॉमर्स पोर्टलवर शॉपिंग | Shopping on e-commerce portals

मित्रांनो ई-कॉमर्स पोर्टलवर खरेदी करून तुम्ही पैसे वाचवू शकता. सर्व ई-कॉमर्स कंपन्या क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेशी टाय-अप करून अतिरिक्त सवलत देतात. क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही इन्स्टंट डिस्काउंट तसेच नो-कॉस्ट EMI, अतिरिक्त कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकता. ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान, कोणत्या कंपनीचे क्रेडिट कार्ड अधिक सूट देत आहे, ते तुम्ही पाहू शकता.

रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकता | Can redeem reward points

मित्रांनो क्रेडिट कार्डने खरेदी करण्यासाठी तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. एकदा तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्स जमा केल्यावर, तुम्ही ते कॅश करू शकता किंवा त्याद्वारे काहीही ऑर्डर करू शकता. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका 20 पैसे ते 75 पैसे प्रति रिवॉर्ड पॉइंट देतात. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 10 हजार पॉइंट असतील तर तुम्ही दोन ते साडेसात हजारांच्या वस्तू मोफत घेऊ शकता.

को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड | Co-branded credit cards

को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड एका विशिष्ट कंपनीच्या सहकार्याने जारी केले जातात. जर तुम्ही सुपर मार्केट, विमान प्रवास, पेट्रोल भरणे इत्यादी ठिकाणी या प्रकारचे कार्ड वापरत असाल तर को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे. यासह, तुम्ही पॉइंट मिळवू शकता आणि त्यांचा वापर सह-ब्रँडेड भागीदारांसह बिले भरण्यासाठी करू शकता.

कॅश बॅक ऑफर | Cash back offer

अनेक वेळा क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकांकडून कॅशबॅक ऑफर दिल्या जातात. त्याचे वेगवेगळे नियम आहेत. हे नियम जाणून तुम्ही जर शॉपिंग करत असाल किंवा वीज, पाणी, फोनचे बिल भरले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

शेवटच्या तारखेच्या आधी देय रक्कम भरा | Pay the due amount before the last date

मित्रांनो शेवटच्या तारखेच्या एक किंवा दोन दिवस आधी क्रेडिट कार्डची देय रक्कम नेहमी भरा. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, ज्यामुळे तुमचे बिलही कमी होईल. चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्यांना बँकेकडून कमी व्याजदरात सहज कर्ज दिले जाते.

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.

FAQ

1.डेबिट होणे म्हणजे काय?
ANS : मित्रांनो भौतिक स्वरूपात हे एटीएम कार्ड अर्थात Debit Card सारखे दिसणारे एक कार्ड आहे. क्रेडिट कार्ड हे वित्तीय संस्थांद्वारे जारी केलेले एक पातळ प्लास्टिक कार्ड आहे जे तुम्हाला ठरलेल्या ठराविक वेळेसाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देते.

2.क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मध्ये काय फरक आहे?
ANS : डेबिट कार्डद्वारे तुम्ही स्वतःच्या बँक खात्यातीलच पैश्यांचा वापर करून व्यवहार करता. मात्र क्रेडिट कार्डद्वारे बँकेकडून पैसे उधार घेतले जात असतात. डेबिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्या पैश्यांवर व्याज द्यावे लागत नाही.


3.१ डेबिट कार्ड म्हणजे काय?
ANS: आजकाल बहुतेक बँका खातेदारांना खाते चालू करताच डेबिट कार्डची सुविधा प्रदान करतात डेबिट कार्डाद्वारे रक्कम कार्डधारकांच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते. यालाच डेबिट कार्ड असे म्हणतात.


(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :मोबाईल चोरीला गेल्यास फक्त एवढेच करा मोबाइल तुम्हाला लगेच भेटेल )

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : तुमचा Smartphone स्लो चालतोय या खास टिप्स वापरुन स्पीड वाढवा – tech news)

धन्यवाद !!

 

1 thought on “क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | Credit Card Information in Marathi 2023”

Leave a Comment