PM Kusum Yojana 2024 | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार pm कुसुम योजना चा लाभ ? लगेच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kusum Yojana 2024 ; महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना  पंतप्रधान कुसुम योजना चा लाभ होणार आहे, त्यासाठी पात्रता कोण आहेत,आणि अर्ज कधी करायचं?

PM Kusum Yojana Maharashtra

शेतकरी हा, आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या भारत देशातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही शेतीव्यवसायावर अवलंबून आहे. 

हे तर आपल्याला माहितीचा आहे, आपल्या शेतकरी, शेतात धान्य पिकवतात म्हणूनच आज संपूर्ण देश सुखा मध्ये अन्य खाऊ शकतो.

आता यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार ने काही योजना आणले आहेत त्यातील एक म्हणजे सरकार कडून आता कुसूम योजना आणले आहे. 

आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी सरकार कडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनात लहान व अल्प भूधारक शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत दिले जाते.

त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याने या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा. त्याचबरोबर ह्या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि अर्ज कुठे करायचा आणि डॉक्युमेंट काय काय लागतात आणि या योजना चे फायदे काय आहेत त्याची सगळे माहिती आहे पुढे दिली आहे. 

त्याच बरोबर महाराष्ट्रातील शेतकरी नापीक जमिनीवर सोलर पॅनल बसून शेतकरी सिंचन पंप चालू शकतात आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळू शकतात. आणि सौर पॅनेल 25 वर्षे टिकतील आणि प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी , सहकारी संस्थान आणि इतर गट त्यांचं लाभ घेऊ शकतात. 

पीएम कुसुम योजने साठी लागणारे कागदपत्र | PM Kusum Yojana document 

मित्रांनो कोणतेही योजनेसाठी आपल्याला डॉक्युमेंट तर नक्कीच लागतात.  त्याच बरोबर पीएम कुसुम योजना साठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स हे पुढील प्रमाणे आहेत.

  1. आधार कार्ड
  2. शिधापत्रिका
  3. मोबाइल नंबर
  4. जमीन कराराची प्रत
  5. पासपोर्ट आकाराची फोटो
  6. बँक खाते पासबुक
  7. अधिकृतता पत्र
  8. नोंदणी प्रत 

असे हे एवढे डॉक्यूमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. 

पीएम कुसुम योजनेचे फायदे कोणते कोणते  | PM Kusum Yojana Benefits 

मित्रांनो  पी एम कुसुम योजना, या योजनेचे नक्की कोणते कोणते फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत.

  1. पर्यावरण संरक्षण : मित्रांनो, या योजने मध्ये शेतकऱ्यासाठी हे सौर ऊर्जा हा स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास खूप मदत होते. 
  2. वीज बिलात कपात होईल : त्याच बरोबर पी एम कुसुम योजनेमुळे  वीज बिला मध्ये खूप मोठे बचत होणार आहे.
  1. सरकारी अनुदान मिळते :मित्रांनो तुम्हाला या योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी अनुदान देते. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचा आर्थिक भार खूप कमी होऊन जातो.
  1. भूजल पातळीत सुधारणा नक्की होईल : तसेच या योजनेमुळे  सिंचन केल्याने शेतकऱ्यांना आवश्यकनुसार पाणी वापरता येते. ज्यामुळे भुजबळ पातळी, सुधारते हे मात्र नक्की. 
  1. शेतकरी स्वावलंबन होऊन जाईल: पी एम कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी सौर पंप असून विज कपातीपासून मुक्त होतात आणि त्यांचे सिंचन गरजा स्वतः पूर्ण करू शकतात त्यामुळे शेतकरी स्वालंबन होऊ शकतात.

पीएम कुसुम योजनेसाठी पात्रता निकष | PM Kusum Yojana Eligibility

पीएम किसान योजनेसाठी , अर्ज करण्यासाठी नक्की पात्रता, निकष काय आहे.

1.  महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, एक तर वैयक्तिक किंवा गटात असू शकतात.

2.  शेतकरी उत्पादन संघटना

3.  सर्व पाणी वापरकर्ता संघटना

4. आर्थिक पात्रता आवश्यक नाही.

५. सौर ऊर्जा प्रकल्पाचे क्षमता 0.5 m ते २ मेगावॅट इतके असावे.

६. अर्जदार हे भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल.

७.  प्रती मेगाव्यासाठी, अंदाजे 2 हेक्टर जमीन आवश्यक असेल.

८. त्याचबरोबर अर्जदार बिल्डरच्या मदतीने प्लांट विकसित करत असल्यास बिल्डरकडे प्रति मेगावॅट 1 कोटी नेट वर्थ असणे आवश्यक आहे.

पीएम कुसुम योजने साठी अर्ज कसा करावा | How to Apply for PM Kusum Yojana

तर मित्रांनो पीएम कुसुम योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढील प्रमाणे आम्ही काही स्टेप सांगतो ते नक्की फॉलो करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पोस्ट पूर्णपणे वाचूनच अर्ज करा.

१. सर्वात पहिले तुम्ही या अधिकृत वेबसाइट वर जा. आणि नोंदणी वर क्लिक करा. 

२. त्या नंतर तुम्ही नोंदणीनंतर कुसुम योजनेवर जा

३. मग तिथे तुम्ही अर्ज भरा.

४. त्याचबरोबर तिथे लागणार आहे, सगळे आवश्यक कागदपत्रे, सबमिट करा.

त्यानंतर अर्ज आणि कागदपत्र मंजूर झाल्या नंतर तुमची पी एम कुसुम योजना अंतर्गत नोंदणी होऊन जाईल. 

मित्रांनो pm कुसुम योजना ची माहिती आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या व्हाट्सअप ग्रुप वरती ही माहिती नक्की शेअर करा निधान आपल्या जवळच्या शेतकऱ्याचा तरी फायदा झाला पाहिजे.

Earn Money Online 2024 ; घर बसल्या मोबाईल वरून पैसे कमावण्याचे काही चांगले मार्ग ! दरमहा ३० हजार पर्यंत कमवू शकता. 

1 thought on “PM Kusum Yojana 2024 | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार pm कुसुम योजना चा लाभ ? लगेच अर्ज करा.”

Leave a Comment