मुलींना मिळणार मोफत सायकल,राज्य सरकारची मोठी घोषणा | Cycle Anudan Yojana Maharashtra 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Cycle Anudan Yojana Maharashtra म्हणजे मुलींना मिळणार मोफत सायकल,राज्य सरकारची मोठी घोषणा.

केंद्र सरकार व राज्य कोणती ना कोणती योजना महिलांसाठी राबवत असते, आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांनी घोषणा केली आहे की, महिलांना अर्धा तिकीट प्रवास योजना चालू केलेली आहे.

मित्रांनो आता एका बातमी पत्रानुसार माहिती मिळालेली आहे, की मुलींना मोफत सायकल सुद्धा मिळणार आहे.तर कोणत्या मुलींना मोफत सायकल मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे.

तसेच या योजनेमध्ये अनुदान किती मिळणार आहे.तसेच या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. 

मित्रांनो राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिली जाणार आहे.

इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या परंतु,शाळेपासून पाच किलो मिटर अंतरावर राहणार्‍या गरजू मुलींना प्राधान्याने सायकलींचे वाटप केले जाणार आहे.

लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सायकल वाटप केले जाणार नसले तरी सायकल खरेदीसाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान देण्याची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागाने सुरु केली आहे.

जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे निधीची मागणी केली असून, त्यांनी मंजूरी दिल्यानंतर निधी वितरीत केला जाणार आहे.

सायकल प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे

  • महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे गरजू मुलींना त्यांच्या शालेय शिक्षणाच्या आठवी ते बारावीपर्यंत कोणत्याही टप्प्यावर सायकल खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असेल.
  • मुलीच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची गरज नाही.
  • या योजनेतील अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
  • सायकल वाटप योजनेंतर्गत मिळालेली लाभाची रक्कम लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते.
  • योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याने (अनुदान) मुली स्वत:चे शिक्षण पूर्ण करून सायकल खरेदी करून भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतात किंवा स्वत:चा स्वयंरोजगार स्थापना करून राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
  • या योजनेतून राज्यातील मुली स्वतंत्र होतील.
    Cycle Anudan Yojana Maharashtra

सायकल वाटप योजनेअंतर्गत समाविष्ट शाळा पुढील प्रमाणे

  1. शासकीय शाळा
  2. जिल्हा परिषद शाळा
  3. शासकीय अनुदानित शाळा
  4. तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना ही योजना लागू करण्यात येईल.
    Cycle Anudan Yojana Maharashtra

सायकल वाटप योजनेचा लाभ कसा मिळवावा पुढील प्रमाणे

  1. पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात साडेतीन हजार रुपये पाठवले जातील
  2. दुसर्‍या टप्प्यात त्यांनी सायकल खरेदी करावी
  3. सायकल खरेदी पावती दाखवल्यानंतर उर्वरित 1500 रुपये बँक खात्यावर जमा होतील
  4. या योजनेत शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येईल
  5. डोंगराळ व अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे.
    Cycle Anudan Yojana Maharashtra

सायकल वाटप योजनेचे फायदे पुढील प्रमाणे

  • लाभार्थी मुलींना सायकल वाटप योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदी करण्यासाठी रु.5000/- ची आर्थिक मदत दिली जाईल या योजनेच्या मदतीने मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहात केले जाईल आणि त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल. शिक्षण
  • या योजनेच्या मदतीने मुलींना घरापासून शाळेत आणि शाळेतून घरी परत जावे लागणार नाही.
  • या योजनेमुळे मुलींचा वेळ वाचणार आहे त्यामुळे मुलींना स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होणार आहे
  • या योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत डीबीटीच्या मदतीने लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

सायकल वाटप योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थी आठवी ते बारावीच्या वर्गात शिकत असावेत.

सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • निवास प्रमाणपत्र
  • पास पोर्ट आकाराचे छायाचित्र
  • मोबाईल नंबर
  • ई – मेल आयडी
  • बँक खाते
  • विद्यार्थी इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
  • सायकल खरेदीची पावती

सायकल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे

  • गरजू विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शाळेत जाऊन शाळेच्या कार्यालयातून किंवा मुख्याध्यापकांकडून या योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज शाळेकडे जमा करा.
  • अर्जदार विद्यार्थ्याने तिच्या स्वत:च्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज प्राप्त करून घ्यावा आणि अर्जात वर दिलेल्या सर्व माहितीसह आवश्यक कागदपत्रांच्या यादीसह सदर कार्यालयात अर्ज सादर करावा.
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Cycle Anudan Yojana Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment