मुतखडा लक्षणे व उपाय | Kidney Stone Symptoms In Marathi 2023

मित्रांनो किडनी स्टोन (Kidney Stone Symptom) झाल्यावर त्या व्यक्तीस प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होत असतात. हा एक असा आजार आहे जो आपल्या मूत्राशयाशी निगडित असतो आणि किडनी स्टोन कोणालाही केव्हाही होऊ शकतो. 

Kidney Stone Symptoms In Marathi

मेडीकल भाषेमध्ये जर सांगायचे झाल्यास नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) यूरोलिथियासिस किंवा (Urolithiasis) या नावाने किडनी स्टोन ला ओळखले जाते. आपल्या शरीरामध्ये किडनी स्टोन निर्माण होण्याचे वेगळे कारण सुद्धा असतात .

किडनी स्टोनची लक्षणं | Symptoms of kidney stone

मित्रांनो बरगड्याच्या खालच्या बाजूस आणि पाठीमध्ये प्रचंड वेदना होणे, पोटात दुखणे,कंबर दुखणे तसेच वेदनेमध्ये चढ-उतार जाणवणे,लघवी करताना त्रास होणे, लघवी करताना आग मारणे ,जळजळ जाणवणे ,गुलाबी, लाल किंवा पांढऱ्या रंगाची लघवी होणे,लघवीतुन दुर्गंधी येणे, वारंवार लघवी लागणे परंतु लघवीला गेल्यावर थांबून थांबून लघवी होणे, मळमळ आणि उलटी इन्फेक्शन झाल्यावर थंडी आणि ताप येणे इत्यादी लक्षणांचा समावेश किडनी स्टोन झाल्यावर होतो.

किडनी स्टोन (Kidney Stone Symptom) हा मेडिकल औषधांद्वारे दूर करता येतो परंतु जर ही लक्षणे काही सौम्य प्रमाणामध्ये जाणवत असतील तर अशा वेळी आपण घरच्या घरी सुद्धा उपचार करून किडनी स्टोन दूर करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी कशा पद्धतीने आपण किडनी स्टोन सहजरीत्या कोणत्याही ऑपरेशन शिवाय दूर करू शकतो.

मुतखडा कशामुळे होतो आणि होण्याची कारणे |What causes kidney stone and its causes

अनुवंशिकता :
मित्रांनो काही लोकांमध्ये अनुवंशिकतेमुळे मुतखड्याची समस्या निर्माण होते. मुतखडा (kidney stone pain) शरीरातील कॅल्शियम ची अधिक वाढ मुळे होऊ शकतो. मुत्रातील कॅल्शियमचे उच्चस्तर पिढी दर पिढी येऊ शकते.

भौगोलिक स्थान :
मुतखड्याच्या समस्येसाठी भोगोलिक स्थान देखील जबाबदार असू शकते. भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान च्या काही भागांमध्ये मुतखड्याची समस्या फार प्रचलित आहे. गरम प्रदेशात राहणे आणि पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ सेवन न करणे ही यामागील प्रमुख कारणे असू शकतात.

षधी :
Diuretics आणि अधिक कॅल्शिअम असलेली अँटासिड औषध घेतल्याने देखील मुत्रामधील कॅल्शियम चे स्तर वाढते आणि मुतखडा होण्याची समस्या निर्माण होते. विटामिन ए आणि विटामिन डी मुळे देखील कॅल्शियमचे स्तर वाढू शकते. एचआयव्ही चा उपचार करत असताना देण्यात येणाऱ्या औषधांमुळे देखील मुतखडा होऊ शकतो.

काही रोग :
मित्रांनो काही जुने रोग जसे सिस्टीक फायब्रोसिस (cystic fibrosis), रिनल ट्यूबलर अॅसिडॉसिस (renal tubular acidosis), आणि इम्प्लिमेंट्री बाहुल (implementer bowel disease) इत्यादीमुळे देखील मुतखडा होऊ शकतो.

किडनी स्टोनचा धोकाह्या लोकांना जास्त असतो |These people are more at risk of kidney stones

  1. 80% रुग्ण पुरुष असतात.
  2. ज्या रुग्णांना वारंवार मूत्रमार्गात संक्रमण होते
  3. 20 ते 49 वयोगटातील व्यक्ती
  4. कुटुंबातील लोक ज्यांना किडनी स्टोन झाल्याचा इतिहास आहे
  5. ज्या व्यक्तींच्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते त्यांना युरिक ऍसिडपासून किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
  6. गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरॉनचा स्राव वाढल्याने लघवी कमी होते, ज्यामुळे दगड तयार होतात.
  7. गरोदरपणात लघवीतून कॅल्शियम उत्सर्जित झाल्याने किडनी स्टोन होण्याचे प्रमाण वाढते.
  8. लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा मूत्रात किडनी तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन तयार होतात.
  9. पाणी किंवा द्रवपदार्थाच्या कमतरतेमुळे किंवा परिश्रम, व्यायाम, अतिसार यांमुळे निर्जलीकरण, किडनी स्टोनची शक्यता वाढते.
  10. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे नायस्टॅगमस होतो आणि त्याचे क्षार जमा होऊन मुतखड्यात बदलतात.

घरच्या घरी कोणतेही औषध न घेता तसेच कोणतेही ऑपरेशन शिवाय आपण जर पुढील काही पदार्थांच्या रसांचे सेवन केले तर किडनी स्टोन (Kidney Stone Symptom) मूत्राद्वारे सहजरीत्या गळून पडण्यासाठी मदत होईल.

मुतखडा घरगुती उपाय मराठीत| Home Remedies For Kidney Stone

लिंबूपाणी प्या | Drink lemon water

मित्रांनो आयुर्वेदिक शास्त्रानुसार (According to Ayurvedic science) तसेच केल्या गेलेल्या संशोधनानुसार किडनीतील (cause of kidney stones) मुतखडा दूर करण्यासाठी व्यक्तीने नियमितपणे लिंबू पाणी प्यायला हवे.“Kidney Stone Symptoms”

लिंबू मध्ये सायट्रीक ॲसिड (Citric acid) असते जे आपल्या शरीरातील कॅल्शियम पासून स्टोन बनवण्यापासून थांबवते. साइट्रेट ऍसिड स्टोनला तोडते आणि म्हणूनच त्यांची हालचाल सुद्धा होते अशावेळी लघवीद्वारे हे स्टोन गळून जाण्याची शक्यता असते.

भरपूर पाणी प्या |Drink plenty of water

मित्रांनो मुतखडा (Kidney Stone Symptoms) पडण्यासाठी घरगुती उपाय म्हणून मुतखड्याच्या समस्येत डॉक्टर भरपूर पाणी पिण्याची सल्ला देतात. पाणी हे अनेक रोगांसाठी उपयोगी आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक रोग होतात .

म्हणून जो व्यक्ती नेहमी जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीराला hydrated ठेवतो तो अनेक रोगांपासून दूर राहतो. मुतखड्याची समस्या असणाऱ्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे कारण तुम्ही जेवढे जास्त पाणी प्याल तेवढेच तुमच्या शरीरातून मुत्र (Urine) बाहेर येईल व हानिकारक शरीरातील पदार्थ तेवढेच बाहेर फेकले जातील.नक्की ट्राय करून बघा .

तुळशीच्या पानांचा रस | Juice of Tulsi leaves

मित्रांनो तुळशीचे आयुर्वेदिक शास्त्रात अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे तसेच मेडीकल शास्त्रांमध्ये सुद्धा तुळशी उपयुक्त मानली गेलेली आहे. तुळशीच्या पानांमध्ये ऍसिटिक ऍसिड असते, जे किडनीतील मुतखडा (Kidney Stone Symptoms) विरघळण्यासाठी तसेच वेदना कमी करण्यास मदत करते.

तुळशीच्या पानांमध्ये अनेक अशी पोषक तत्व (nutrients) असतात ज्याचा उपयोग आपल्या शरीरातील पचन संस्था उत्तमरीत्या कार्य करण्यासाठी होत असतो तसेच जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची सूज (swelling) निर्माण झाली असेल तर ती सुद्धा तुळशीच्या पानांच्या रसामुळे दूर होते. तुळशीच्या पानांच्या रसामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि अँटीबॅक्टरियल, अँटी इन्फ्ला मेंट्री गुणधर्म असतात यामुळे आपल्या शरीरातील किडनीचे आरोग्य चांगले राहते. हे पण नक्की ट्राय करा

डाळिंबाचा रस | Pomegranate juice

मित्रांनो किडनीच्या (kidney stones treatment) आरोग्यासाठी अनेक शतकांपासून डाळिंबाचा रस वापरला जात आहे. डाळिंबाचा रस तुमच्या शरीरातील टॉक्सिन आणि स्टोन बाहेर टाकतो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे तुमची किडनी निरोगी ठेवतात आणि दगड तयार होण्यास प्रतिबंध करतात.

यासोबतच तुमच्या लघवीची आम्लताही कमी करते. लघवीची आम्लता जितकी कमी असेल तितकी भविष्यात दगड तयार होण्याची शक्यता कमी असते. हे पण नक्की ट्राय करा

अॅपल सायडर व्हिनेगर |Apple Cider Vinegar

मित्रांनो अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) मध्ये किडनी स्टोनला विरघळवण्याचे सामर्थ्य असते. जर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर आहारात केला तर तुमच्या मूत्रावाटे मुतखडे (Kidney Stone Symptoms) विरघळून बाहेर पडू शकतात. शिवाय तुमच्या वेदनादेखील कमी होतात. चांगल्या परिणामासाठी दररोज अॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि  निरोगी राहा. घरीच मुतखडा उपचार करण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे.हे पण नक्की ट्राय करा .

FAQ –मुतखडा लक्षणेव उपाय

प्रश्न. मुतखड्यामुळे (Kidney Stone Symptoms )कोणत्या समस्या निर्माण होतात?
उत्तर- लघवी करताना वेदना होतात.
लघवी मध्ये रक्त
लघवीचा असामान्य वास.
लघवीचा रंग कमी होणे.
एका वेळी फक्त थोड्या प्रमाणात लघवी बाहेर पडणे.

प्रश्न. किडनी स्टोन किती दिवसात बरा होतो
मित्रांनो जर आपला मुतखडा लहान असेल तर उपाय सुरू केल्याच्या 1 ती 2 महिन्यात बरा होऊ शकतो. परंतु बऱ्याचदा याला ऑपरेशन करण्याची गरज भासू शकते.

प्रश्न. मुतखड्याचे दुखणे किती काळ राहते?
उत्तर- जेव्हा दगड मूत्रमार्गाकडे सरकतो तेव्हा वेदना पोटाच्या खालच्या भागात आणि श्रोणि-मांडीच्या सांध्यापर्यंत पोहोचते. ही वेदना सहसा 5-15 मिनिटे राहते.

टीप : हा लेख फक्त साधारण माहितीसाठी देण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारची औषधे व उपचार तुम्हाला Marathi Forever करण्याचा सल्ला अजिबात येत नाही. जर तुम्हाला कोणती लक्षणे जाणवत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यानंतरच योग्य तो उपचार करा.

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : तुमचा Smartphone स्लो चालतोय या खास टिप्स वापरुन स्पीड वाढवा – tech news)

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)





 

Leave a Comment