Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आता महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये त्याचा फॉर्म कसा भरायचा?
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजने मध्ये २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे.
आपल्या महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. आणि ह्याचा फायदा नक्की होईल महिलांना.
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लाभ कसा घेणार आणि कोणाला घेता येणार? आणि अर्ज कुठे करायचं या सगळ्या प्रश्न च उत्तर पुढील माहिती मध्ये दिले आहे .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?
महाराष्ट्र सरकारची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ सुमारे एक कोटी महिलांना घेता येणार आहे. आणि या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
आणि यासाठी वर्षाला 2 लाख 50 हजार 500 रुपये पेक्षा कमी आवक असा निकष आहे. हे मात्र लक्षात ठेवा अर्ज करताना
सरकारच या योजने च दोरण फक्त राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, व तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत बदल व्हावी यासाठी राज्य सरकारची ही खूप महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय.
आणि या Ladki Bahin Yojana योजनाचा लाभ आता १ कोठी महिलांनी घेतलाच पाहिजे.त्या साठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेर करा आपल्या मित्राला.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
- किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.हे मात्र लक्षात ठेवा
- लाभार्थी महिला आपल्या महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.नाही तर या योजनाचे लाभ घेता येत नाही .
- आपल्या राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- सर्वात महत्वच म्हणजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. Ladki Bahin Yojana या योजचा लाभ घेता येत नाही .
या योजना मध्ये कोणत्या महिला अपात्र असतील?
- सर्वात पहिले ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.त्यांना Ladki Bahin Yojana याचा फायदा नाही होणार.
- आणि ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- आणि लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
या योजनेच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य)
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
या योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे ?
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.हे मात्र लक्षात ठेवा
- मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
- पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.तिथे जाऊन तुम्ही करू शकता.
- वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची पोच पावती दिली जाईल.
- अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
अर्ज कधी पासून सुरू आहेत ?
- आज पासून म्हणजे 1 जुलै 2024 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल.
- अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 आहे. हे मात्र लक्षात ठेवा. या अगोदरच अर्ज करा तुम्ही
- तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024
- आणि त्या तात्पुरत्या यादीवरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे.
- अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे.
- लाभार्थ्यांचे बँकमध्ये E-KYC करणे 10 ऑगस्ट 2024
- लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024
- त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा .
मित्रांनो ही माहिती लगेच आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
8 thoughts on “सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana”