पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते | manache 5 Ganpati name in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

manache 5 Ganpati name in Marathi : पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते आणि कुठे आहेत व त्यांचा इतिहास काय आहे वाचा सविस्तर.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2024) सुरूवात केली होती.

त्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थात पुण्यात गणेश उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

पुण्यात मानाच्या पाच गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (shreemant Dagdusheth Halwai Ganapati), मंडई गणपती (Mandai Ganapati) हे नवसाला पावणारे गणपती आहेत.

गणपतीच्या 10 दिवसांच्या काळात दरवर्षी या गणपतींच्या दर्शनासाठी लोक अगदी बाहेरगावहूनही येतात. काळानुसार पुण्यात गणेशोत्सवाचं स्वरुप बदललं असल तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचं महत्त्व आजही कायम आहे. जाणून घेऊया कोणते आहेत मानाचे पाच गणपती.

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. manache 5 Ganpati name in Marathi जाणून घेऊया या पाच मानाच्या गणपतींबद्दल.

मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती (Shri Kasba Ganesha)

मित्रांनो कसबा गणपती (Shri Kasba Ganesha) हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे.

अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या (Shri Kasba Ganesha) सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. manache 5 Ganpati name in Marathi

मानाचा दुसरा गणपती – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती | (Shri Tambadi Jogeshwari Ganapathy )

मित्रांनो श्री तांबडी जागेश्वरी (Shri Tambadi Jogeshwari Ganapathy ) ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला.

बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते.manache 5 Ganpati name in Marathi

मानाचा तिसरा गणपती – श्री गुरुजी तालीम गणपती | (Shri Guruji Talim Ganpati)

मित्रांनो गुरुजी तालीम (Shri Guruji Talim Ganpati) मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. manache 5 Ganpati name in Marathi

लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

मानाचा चौथा गणपती – श्री तुळशीबाग गणपती | (Shri Tulshibag Ganapati)

मित्रांनो पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे (Shri Tulshibag Ganapati) तुळशी बागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे.

दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.manache 5 Ganpati name in Marathi

मानाचा पाचवा गणपती – श्री केसरी गणपती | (Shri Kesari Ganapati)

मित्रांनो पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती(Shri Kesari Ganapati). केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला.

या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. manache 5 Ganpati name in Marathi

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती |(Rich Dagdusheth Halwai Ganapati 2022)

मित्रांनो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Rich Dagdusheth Halwai Ganapati) हा पुण्यामधील प्रसिद्ध गणपती आहे.

सुमारे १८९३ चा काळ. तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Rich Dagdusheth Halwai Ganapati) हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर तेथे त्यांची रहावयाची इमारत होती.

त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Rich Dagdusheth Halwai Ganapati) यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले.

दरम्यान त्यांच्या गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर देत सांगितले की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि ही दोन्ही दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील.

महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे.

मित्रांनो सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला.

दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून प्ळ्खला जात होता.

या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.सन १९६८ 

मित्रांनो सन १८९६ साली बनवलेल्या मुर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रताप गोडसे, माणिकराव चव्हाण,

दिंगबर रासने, रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे, उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे इत्यादी कार्यकर्त्यांनी गणपतीची नवीन मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली.

मित्रांनो manache 5 Ganpati name in Marathi हे आर्टिकल कसं वाटला नक्की कोममेंट्स करून सांगा . गणपती बाप्पा मोरया !

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

Leave a Comment