गर्भवती महिलांच्या खात्यात या योजनेतून 5000 रुपये जमा होणार आहेत कोणती योजना,अर्ज कुठं करायचा? Pradhan Matru Vandana Yojana 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Matru Vandana Yojana : या योजने मधून महिलांच्या खात्यात 5000 हजार रुपयाची रक्कम पाठवले जाते. ही कोणती योजना आहे कोणती कागद पत्रे लागतात अर्ज कुठे करायचा , जाणून घेऊया ?

pradhan mantri matru vandana yojana online registration

मित्रांनो आपल्या देशातील महिलांसाठी केंद्रसरकार असो, या राज्य सरकार महिलांसाठी नेहमीच योजना आणत असतात आणि त्या योजणांचा फायदा आपल्या महिलांना नक्कीच होत असतो. 

आता बहु चर्चेत असलेले महिलांसाठी लेक लाडकी योजनेचा आपण उदाहरण बघू शकता. लेक लाडकी योजने मध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ही योजना पण सर्वस्वी यशस्वी झाली आहे. 

आता असेच एक योजना केंद्र सरकार ने गर्भवती महिलांसाठी आणली आहे ती योजना म्हणजे प्रधान मंत्री मातृ वंदना योजना. Pradhan Matru Vandana Yojana ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे चालवण्यात येते.

त्यासोबतच या योजनेचे अमलबजावणी गर्भवती माता स्तनदा माता, तसेच नवजात बालकाच्या आरोग्य सुधारण्यासाठी हे योजना आखली आहे. या योजने मार्फत महिलांना 5 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही मदत 3 टप्प्यामध्ये देण्यात येते.

  • सर्वात पहिला टप्पा हा महिला नोंदणी केल्यानंतर भेटतो . त्यामध्ये १००० रुपये मिळतात.
  •  त्यानंतर गर्भधारणे ला सहा महीने पूर्ण झाल्यावर त्या महिलांना 2,000 दिले जातात.
  • त्या नंतर प्रसृष्टी नंतर बाळाच्या जन्माची नोंदणी आणि पहिल्या लसीकरण नंतर दोन हजार रुपये मिळतात. 

ही योजना, महिलांसाठी केंद्र सरकार 1 जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात आले आहे. आणि आज पर्यंत बऱ्याच महिलांनी या योजनेचा फायदा घेतला आहे .

आता उर्वरित महिलांनी सुद्धा या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावं आता या योजनेला अर्ज कुठे करायचा? अर्ज करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात जाणून घेऊया. 

प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

मित्रांनो, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा Pradhan Matru Vandana Yojana लाभ कोणाला मिळू शकतो. जाणून घ्या. 

  • सर्वात पहिले तर जे दारिद्र रेषेखालील महिला तसेच दारिद्र्य रेषेवरील महिलांना या योजनेचा नक्कीच लाभ घेता येतो. 
  •  या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पुढे दिले आहेत. जर तुम्हाला या योजनेचे लाभ घ्यायचा असेल तर त्वरित अर्ज करावे. 

त्याच बरोबर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून ही योजना राबवली जात आहे.या योजनेत महाराष्ट्रातील आठ लाख 37 हजार 399 गर्भवती महिला व मातांनी यांचा लाभ जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान घेतला आहे. 

 यानंतर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मध्ये 2017 पासून ते 2022 पर्यंत एकूण 34 लाख 9449 महिलांना यांचा लाभ मिळण्याची माहिती ही समोर आली आहे. 

प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेला लागणारे कागदपत्रे ? 

  1. आधार कार्ड
  2.  रहिवासी दाखला
  3.  उत्पन्नाचा दाखला
  4.  जात प्रमाणपत्र
  5.  बाळाच्या जन्माचा दाखला
  6.  पॅन कार्ड 
  7. पासबुक
  8. पासपोर्ट साइज फोटो

हे एवढे कागद पत्र तुम्हाला लागतील. हे एवढे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच या योजनेचा फायदा घ्यावा. आणि योजनेसाठी अर्ज कुठे करायचे याची माहिती खाली दिली आहे, नक्की वाचा.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Pradhan Matru Vandana Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित महिलांचे वय 19 वर्षापेक्षा अधिक असलं पाहिजे तरच या योजनेचा लाभ भेटेल.

आणि त्याच बरोबर ज्या महिला या योजनेचा लाभ घ्यायचंय त्या वेळी महिला गर्भवती असणं आवश्यक आहे.

आणि जर या गर्भवती महिला शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करत असतील तर त्यांना या प्रधान मंत्री मातृ वंदन योजनाचा लाभ भेटणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. 

हे पण वाचा : मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता , हवामान विभागाने दिला अंदाज Marathwada Rain update news

प्रधान मंत्री मातृ वंदना योजने साठी असा करा अर्ज ?

  • या योजने साठी अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावा लागेल.
  •  त्यानंतर तुमच्या समोर सिटीझन लॉगिन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  • नंतर तुम्ही तेथे आत्ता नोंदणी करून घ्या. त्यानंतर जे अर्ज भरला आहात ते दाखल करा.
  •  अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  •  जर तुम्हाला हे ऑनलाइन करायला जमत नसेल तर  तुमच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. तुम्ही तेथे जाऊन त्यांना विचारू शकता.
  • मग त्या नंतर फॉर्म भरू शकता.

 मित्रांना Pradhan Matru Vandana Yojana ही माहिती खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्या जवळील मित्रांना नक्की शेअर करा त्याचातरी फायदा होईल. आणि आपल्या फॅमिली व्हाट्सअप ग्रुप वरती ही महत्वाची माहिती नक्की शेअर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

हे पण वाचा : credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?

Leave a Comment