मित्रांनो, आपण नेहमीच पेपर मध्ये किंवा टीव्ही वरती न्यूज बघताना GDP हा शब्द ऐकला आहे. नक्की हा GDP आहे तरी काय? GDP Full form in Marathi
चला आपण आज जीडीपी म्हणजे काय? तो कुठे वापरला जातो? जीडीपी चे काय महत्व आहे? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात.कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती आपल्याला GDP नुसार कळते. GDP Full form in Marathi
जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असते. सोप्या शब्दांत,सांगायचे म्हटले तर जीडीपीचा दर वाढला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असे म्हणता येते.जीडीपीचा दर कमी झाला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असे म्हटले जाते.
जीडीपी फूल फॉर्म काय आहे | What is the full form of GDP
मित्रांनो,GDP चा फूल फॉर्म ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (Gross Domestic Product) असा आहे. हे जीडीपी चे इंग्लिश मधील पूर्ण नाव झाले. आपल्या मराठी भाषेत आपण GDP ला “सकल देशांतर्गत उत्पादन” असे म्हणतो. कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी GDP हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. GDP Full form in Marathi
जीडीपी ची व्याख्या | Definition of GDP
मित्रांनो, जीडीपी(GDP) म्हणजे देशाच्या अंतर्गत विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजेच जीडीपी होय.”
मित्रांनो, देशाची आर्थिक स्थिती ही सकल देशांतर्गत उत्पादन अंतर्गत(GDP) मोजण्यात येत असते. देशाची आर्थिक स्थिती ही प्रत्येक तीन महिन्यानंतर मोजण्यात येत असते. GDP Full form in Marathi
कृषी, उद्योग आणि सेवा यांच्या आधारे देशात GDP मोजता येतो. या मध्ये सेवा क्षेत्र, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, संगणक इत्यादींचाही सरकारने सकल देशांतर्गत उत्पादनांमध्ये समावेश केला आहे.
आपल्या भारत देशात वर्षातून चार वेळा जीडीपी मोजण्यात येतो. ठराविक काळामध्ये एका देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांचा खर्च म्हणजेच GDP.
जीडीपी मध्ये उत्पन्न कोणी कमवले हे विचारात घेतले जात नाही फक्त भारताच्या भौगोलिक सीमा अंतर्गत घेतलेले उत्पादन लक्षात घेतले जातात. उत्पन्न भारतातील कंपनीचे असू शकते व विदेशातील कंपनीचे सुद्धा असू शकते.
जीडीपी कसा काढायचा | How to Calculate GDP
मित्रांनो, आपण पुढे दिलेल्या फॉर्म्युला नुसार GDP मोजमाप करू शकतो.
GDP = C + I + G + (X – M)
जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च + (आयात – निर्यात)
1.उपभोग – Consumption
उपभोग यामध्ये लोकांचा वैयक्तिक खर्च म्हणजेच घर भाडे, घरगुती खर्च, नवीन घराचा खर्च यांचा समावेश होतो.
2.गुंतवणूक – Investment
गुंतवणूक म्हणजेच देशांच्या सीमा अंतर्गत एकूण वस्तू आणि सेवा त्यांच्यावर झालेला एकूण खर्च होय.
3.सरकारी खर्च – Government Expenses
सरकारी खर्च यामध्ये सरकार द्वारे करण्यात आलेल्या सर्व खर्च यांचा समावेश होतो.
4.निर्यात – Export
निर्यात यामध्ये देशातील अशा वस्तू आणि सेवा यांचा समावेश देशातील जीडीपी मध्ये होतो परंतु त्या वस्तू दुसऱ्या देशासाठी तयार केल्या जातात.
5.आयात – Import
आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा मध्ये या उत्पादनांचा समावेश केला जातो ज्यांचे उत्पादन आपल्या देशाच्या सीमा अंतर्गत होत नसते. आणि जीडीपीची गणना करताना आयात ही निर्याती मधून वजा केली जाते.
जीडीपी चे प्रकार | Types of GDP
मित्रांनो, जीडीपी चे 2 प्रकार आहेत ते खालिलप्रमाणे आहेत.
1.नॉमिनल जीडीपी | Nominal GDP
मित्रांनो, जेव्हा एका वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही बाजार मूल्य किंवा चालू किंमतीशी केल्यावर ज्या जीडीपी चे मूल्य प्राप्त होते त्या जीडीपी ला नॉमिनल जीडीपी Nominal GDP असे म्हटले जाते.
Real GDP च्या तुलनेत Nominal GDP मध्ये देशाचा GDP नेहमी अधिक असतो कारण यामध्ये महागाईचे मूल्य (inflation value) समाविष्ट असते. GDP Full form in Marathi
नॉमिनल जीडीपी चे सूत्र = उत्पादनांची संख्या × स्थिर मूल्य
नॉमिनल जीडीपी चे आकडे कमी विश्वसनीय मानले जातात कारण ते अर्थव्यवस्थेची वास्तविक स्थिती दर्शवित नाहीत.
2.रिअल जीडीपी | Real GDP
मित्रांनो, जेव्हा एका वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही आधार वर्षाचे मूल्य किंवा स्थिर किंमतीवर केली जाते तेव्हा ज्या जीडीपी चे मूल्य प्राप्त होते त्या जीडीपी ला रिअल जीडीपी Real GDP असे म्हटले जाते.
रिअल जीडीपी चे सूत्र = उत्पादनांची संख्या × बाजार मूल्य
रिअल जीडीपी चे आकडे विश्वसनीय मानले जातात, कारण ते अर्थव्यवस्थेची खरी स्थिती दर्शवितात. GDP Full form in Marathi
जीडीपी चे महत्व | Importance of GDP
मित्रांनो, GDP देशातील सर्व लोकांवर परिणाम करतो. GDP द्वारे आर्थिक विकासदर विकास देशाची परिस्थिती समजते. देशाचा जीडीपी दर कमी असल्यास देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची संख्या कमी आहे असे समजून देशांतील लोकांचे सरासरी उत्पन्नही कमी असते.
जर देशाचा जीडीपी जर हा चांगला असेल तर देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची संख्या जास्त असल्यामुळे देशाचा विकास होत असतो. देशाचा जीडीपी कमी असल्यास देशावरती आर्थिक संकट येत असते.
तसेच देशातील जीडीपीच्या आधारे सरकारची ध्येयधोरणे बदलत असतात यामध्ये सरकार महत्त्वाची भूमिका पार पाडते कारण सरकारची धोरणे स्थानिक पातळीवर यशस्वी ठरली तरच जीडीपीमध्ये वाढ होणार आहे. जीडीपी कमी होत असेल किंवा वाढत नसेल तर सरकारला आपल्या धोरणांवर काम करण्याची गरज असते .
अशा प्रकारे आपण या लेखात GPD (सकल देशांतर्गत उत्पादन) या बद्दल माहिती घेतली. ही महिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा.
धन्यवाद !
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)
(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा : IFSC Code म्हणजे काय मराठी मध्ये , कसा शोधायचा? )