GST Information 2023 in Marathi | मराठी मध्ये जीएसटी ची माहिती

मित्रांनो,GST हा कर आकारण्याचा एक प्रकार आहे. आपल्या भारत देशात पूर्वी अस्तित्वात असलेली कर प्रणाली बदलवून नवीन कर प्रणाली “एक देश एक कर” म्हणजेच GST लागू करण्यात आला आहे. GST Information 2023 in Marathi

जीएसटी म्हणजे काय आहे, जीएसटी चा मराठी अर्थ काय आहे, आपल्या भारत देशात जीएसटी कधी लागू झाला, जीएसटी चे प्रकार,GST चे फायदे आणि जीएसटी ची कार्यपद्धती या विषयी माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे.

जीएसटी चा फूल फॉर्म | Full Form Of GST 2023

मित्रांनो,GST चा फूल फॉर्म Goods and Service Tax असा आहे.GST ला च मराठी मध्ये “वस्तू आणि सेवा कर” असेही म्हटले जाते. जीएसटी हा ग्राहकांवर वस्तू किंवा सेवांच्या खरेदी च्या बदल्यात कर म्हणून लावण्यात येत असतो. GST Information 2023 in Marathi

आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली (GST) आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू केली आहे.GST च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आता प्रत्येक वस्तूवर एकच कर लागतो.

आपल्या  भारतात  GST लागू होण्यापूर्वी ग्राहकांना प्रत्यक्ष कर तसेच अप्रत्यक्ष कर हा द्यावा लागत होता. तेव्हा 32 कर होते आता एकच कर हा GST लागू आहे.

GST म्हणजे काय | What is GST

मित्रांनो, एखाद्या वस्तु तसेच सेवेचा उपभोग घेण्यासाठी ग्राहकांना जो कर द्यावा लागत असतो त्यालाच जीएसटी असे म्हणतात.आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली (GST) आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू केली आहे. GST Information 2023 in Marathi

GST च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आता प्रत्येक वस्तूवर एकच कर लागतो.

आपल्या भारत देशात GST लागू होण्यापूर्वी ग्राहकांना प्रत्यक्ष कर तसेच अप्रत्यक्ष कर हा द्यावा लागत होता.

तेव्हा 32 कर होते आता एकच कर हा GST लागू आहे. देशामधल्या सर्व नागरीकांना हा वस्तु अणि सेवा कर समान रीतीने भरावा लागत असतो.

वस्तु अणि सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर असतो जो आपल्याला अप्रत्यक्षपणे भरावा लागत असतो. म्हणजेच आपण कुठल्याही वस्तुची तसेच सेवेची जर खरेदी केली तर त्यावर आपणास हा कर आकारला जात असतो.

जीएसटी चे प्रकार | Types Of GST

मित्रांनो, वस्तू व सेवा कर (GST) चे चार प्रकार पडतात. ते पुढे दिलेले आहेत.

1) सीजीएसटी (CGST)

Central Government GST (CGST) म्हणजे Central Goods and Services tax. या प्रकारात केंद्र सरकारकडून कर गोळा केला जातो. CGST हा 9% आकारला जातो.

2) एसजीएसटी (SGST)

State Government GST (SGST) हा आपल्या भारत देशातील कोणत्याही राज्यात राज्य सरकारच्या करांतर्गत लावला जातो. राज्य तर्फे वस्तू तसेच सेवांच्या खरेदी विक्री वर SGST लावला जातो.हा कर हा 9% इतका आहे. CGST+ SGST असे मिळून १८% कर लावला जातो.

3) यूटीजीएसटी (UTGST)

Union Territory GST (UTGST) हा केंद्रशासित प्रदेशांत आकारला जातो. केंद्र शासित प्रदेशात वस्तू व सेवा वर हा यूटीजीएसटी लावण्यात येतो. हा UTGST दिल्ली,अंदमान आणि निकोबार बेट,चंदीगड, दादरा-नगर हवेली आणि दमन दिव,लक्षद्वीप, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर, लद्दाख ह्या केंद्र शासित प्रदेशात लावला जातो.केंद्र शासित प्रदेशात CGST आणि UTGST आकारला जातो.

4) आयजीएसटी (IGST)

Integrated GST (IGST) हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लावण्यात येत असतो. जर तुम्ही वस्तू ही महाराष्ट्रात उत्पादित केल्यास आणि ती वस्तू तुम्हाला उत्तरप्रदेश मध्ये विकायची आहे अशा वेळेस IGST लावण्यात येतो.

जीएसटी (GST) रिटर्न कसा भरायचा माहिती | How To Fill GST Return Information

मित्रांनो, GST रिटर्न हे सर्व उत्पन्न/विक्री आणि/किंवा खर्च/खरेदीचे तपशील असलेले दस्तऐवज आहे जे करदात्याने (प्रत्येक GST धारकाला) कर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाखल करणे आवश्यक आहे. निव्वळ कर दायित्वाची गणना करण्यासाठी कर अधिकार्यांकडून याचा वापर केला जातो.

तुम्ही खाली दिलेल्या स्टेप नुसार तुम्ही तो भरू शकता : GST Information 2023 in Marathi

1. सर्वप्रथम www.gst.gov.in भेट द्या.

2. आपल्याला 15-अंकी जीएसटी आयडी क्रमांक आपल्या पॅन कार्ड नंबर आणि राज्य कोडच्या आधारे दिला जाईल.

3. आपल्या पावत्या पोर्टलवर अपलोड करा. त्यानंतर आपल्याला प्रत्येक बिलासाठी स्वतंत्र चलन क्रमांक जारी केला जाईल.

4. त्यानंतर मासिक रिटर्न, आवक परतावा आणि बाह्य परतावा भरा. आपण त्यात दुरुस्ती करू शकता आणि कोणतीही त्रुटी असल्यास रिटर्न रीफील करू शकता.

5. जीएसटीआर -1 (GSTR-1) फॉर्ममधील बाह्य पुरवठा परतावा तुम्हाला पुढील महिन्याच्या 10 रारीख किंवा त्यापूर्वी GST (जीएसटी) पोर्टलच्या माहिती विभागाद्वारे भरायचा आहे.

6. पुरवठादाराने (Supplier) दाखल केलेल्या बाह्य पुरवठ्यांचा (External supplies) तपशील तुम्हाला जीएसटीआर -2 ए मध्ये प्राप्तकर्त्यास उपलब्ध करुन दिला जातात.

7. प्राप्तकर्त्यास बाह्य पुरवठा तपशील दाखल करणे, आणि सुधारित करणे आवश्यक आहे आणि डेबिट आणि क्रेडिट नोट्सचा तपशील दाखल करणे आवश्यक आहे.

8. प्राप्तकर्त्यास (Recipient) जीएसटीआर – 2 फॉर्ममध्ये आवक पुरवठ्याचा (Incoming supply) तपशील भरावा लागतो.

9. त्यानंतर पुरवठादार जीएसटीआर -1 ए मध्ये प्राप्तकर्त्याद्वारे केलेल्या तपशीलांमधील कोणतेही बदल स्वीकारू किंवा नाकारू शकतो.

जीएसटीचे फायदे | Benefits of GST

 1. जीएसटी (GST) संपूर्ण देशामध्ये कर प्रणालीचे एकसामाईकरण करेल. यामुळे करांवर कर आकारून वस्तू व सेवांच्या किमती वाढण्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल.

2. जीएसटी (GST) अंतर्गत, यापुढे हे होणार नाही म्हणजे ही एकीकृत कररचना असून, संपूर्ण अप्रत्यक्ष कर प्रणालीला तिने एका छत्राखाली आणले आहे. GST Information 2023 in Marathi

3. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जीएसटी अंतर्गत, इनपुट टॅक्स क्रेडिट हे वस्तू आणि सेवा दोन्हीवर मिळू शकते, ज्यामुळे देखील करांवर कर आकारणीचा कॅस्केडिंग प्रभाव दूर झाला आहे. GST Information 2023 in Marathi

4. नियमित जीएसटी विवरण हे व्यवस्थेतील कर अनुपालनाची शिस्त वाढवण्यास मदतकारक ठरले आहे.

5. कर चोरीला पायबंद बसून सरकारचा महसूलही वाढला आहे.

वस्तू आणि सेवा वरील जीएसटी दर | GST Rate On Goods and Services

  • जीएसटी (GST) अंतर्गत 5% कर असणाऱ्या स्लॅब मध्ये दैनंदिन जीवनात आपण वापरत असणाऱ्या आवश्यक वस्तू आहेत. जसे की, चहा, कॉफी, दूध पावडर, तेल, मसाले, आयुर्वेदिक औषधे, साखर,अगरबत्ती, पिझ्झा ब्रेड, खते या आवश्यक वस्तूंवर 5% इतका GST आकारला जातो. GST Information 2023 in Marathi
  • जीएसटी (GST) अंतर्गत 12% दर स्लॅब मध्ये छत्री, तूप, लोणी, चीज,स्नॅक्स, टूथपेस्ट, लोणचे, भ्रमनध्वनी, औषधे या आपण रोज वापरात असलेल्या वस्तूंवर GST हा 12% आकारला जातो.
  • जीएसटी (GST) अंतर्गत 18% कराचा दर असलेल्या स्लॅब मध्ये खालील वस्तूचा समावेश होतो. या 18% gst दर असणाऱ्या वस्तू ह्या पेस्ट्री आणि केक्स, आइस्क्रीम, शॅम्पू, रेफ्रिजरेटर,चॉकलेट, मिनरल वॉटर, परफ्यूम, दूरदर्शन, वॉशिंग मशीन, डिटर्जंट यांचा समावेश होतो. या वस्तू सहसा मध्यम उत्पन्न गटातील लोकांकडून वापरल्या जातात.
  • जीएसटी (GST) अंतर्गत 28% कराचा दर असलेल्या स्लॅब मध्ये चैनीच्या तसेच आरोग्यास अपायकारक वस्तू यांचा समावेश होतो. जसे की सिगारेट, पान मसाला, ऑटोमोबाईल्स, पंचतारांकित हॉटेल्समधील निवास वेंडिंग मशीन, डिशवॉशर, सिमेंट या वस्तूंवर GST  हा 28% आकारला जातो.

जीएसटी नसलेल्या वस्तू आणि सेवा | Non-GST Goods and Services

मित्रांनो, जीएसटी (GST) अंतर्गत काही वस्तू आणि सेवा यांना करमुक्त ठेवले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. उदा; मीठ, ताज्या भाज्या, अन्नधान्य,वर्तमानपत्रं, सॅनिटरी नॅपकिन्स या वस्तू GST अंतर्गत करमुक्त आहेत.

जीएसटी बद्दल सांगितलेली वरील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेन्ट मध्ये कळवा.

धन्यवाद !!!


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा : IFSC Code म्हणजे काय मराठी मध्ये , कसा शोधायचा? )

Leave a Comment