घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी 2023 | Hair Growth Tips in Marathi 2023

घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी 2023 : मित्रांनो आपले केस सुद्धा (Hair Growth) लांबसडक व घनदाट असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लांबसडक केस हे आपला लुक सुद्धा अजून भन्नाट करतात. 

Hair Growth Tips in Marathi 2022

 मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचे केस सुद्धा कंबरेपर्यंत लांब व्हावेत आणि त्यासाठी तुम्ही अनेक उपाय सुद्धा ट्राय करून पाहिले असतील, पण जो उपाय दुसऱ्यासाठी उपयोगी पडला तोच तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल असे नाही कारण प्रत्येकाच्या केसांची जडणघडण वेगळी असते.

निसर्गाने आपल्याला अनेक पोषक तत्व दिले आहेत. चेहऱ्याचा रंग सुधारणाऱ्या फेस मास्कपासून ते केस मजबूत आणि सुंदर बनवणाऱ्या उत्पादनांपर्यंत सर्व काही आपल्याला निसर्गाकडून मिळाले आहे. (Hair Care Tips)  त्याचप्रमाणे औषधी वनस्पती ही निसर्गाची देणगी आहे.

केस गळण्याची (Hair Growth) किंवा कमी होण्याची कारणे खालील प्रमाणे असू शकतात

  • निरोगी आहाराचा अभाव
  • अनुवांशिक केसाच्या समस्या
  • प्रदूषण
  • केसांची काळजीचा अभाव
  • ताण- तणाव
  • जीवनशैली
  • चुकीचे शैम्पू किंवा तेल वापरणे

असे केस गळतीची अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे आज या पोस्ट मध्ये आम्ही केसांशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी टिप्स घेऊन आलो आहोत आणि आजच्या या पोस्टमध्ये आम्ही केस दाट करण्याच्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत. हे वापरून पहा, तुम्ही लवकरच तुमचे लांब दाट केस ओवाळू शकाल.

1)आवळा हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

मित्रांनो केसांची वाढ (Hair Growth) वाढवण्यासाठी आवळा (Amla) ही उत्तम औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. आवळा अर्काचा केसांच्या कूपांच्या आतील पेशींवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.

केस धुण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे आवळा तेल किंवा त्याच्या अर्काने टाळूला मसाज करा. आवळा टॅब्लेट किंवा सप्लिमेंट स्वरूपात देखील उपलब्ध आहे. पण लक्षात ठेवा की आवळा हा प्रत्येकासाठी केस वाढवण्याचा चांगला मार्ग आहे असे सिद्ध होत नाही. केसांवर लावल्याने काहींना अॅलर्जी होऊ शकते.

2) समतोल आहार हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

मित्रांनो आहार जर संतुलित नसेल अथवा त्यात पोषक तत्वांची कमी असेल तर त्याचा परिणाम हा शरीरासोबत केसांवर (Hair Growth) देखील होतो.त्यामुळे आपल्या आहारात डाळ, फळ भाज्या , फळे इत्यादीचा समावेश महत्त्वाचा असतो.

काही फळे जशी केळी, सफरचंद, आवळा यात प्रथिने आणि जीवनसत्वे (अ, क) हे जास्त प्रमाणात असतात त्यामुळे केस तसेच त्वचा टवटवीत राहण्यात मदत होते. फळांसोबतच रोजच्या जेवणात दही चा समावेश करणे देखील केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे.

3) ऐलोवेरा जेल हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

मित्रांनो हा सगळ्यात सोप्प्या उपाय आहे आणि तुम्ही करून पाहिलाच पाहिजे. ऐलोवेरा केसांसाठी (Hair Growth) खूप फायदेशीर समजले जाते. याची जेल देखील तितकीच प्रभावी असते.

यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते. तुम्ही ही जेल स्कॅल्पवर लावून केवळ 30 मिनिटे ठेवायची आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचे तेल सुद्धा मिक्स करू शकता आणि केसांना लावू शकता.

महिनाभर सतत अप्लाय केले तर तुम्हाला याचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळेल. पण प्रिझर्व्ह केलेल्या ऐलोवेरा जेलचा सहसा वापर करू नका. घरच्या घरीच ताज्या कोरफडीचा गर काढून त्याचा वापर करणे कधीही उत्तम!

4) कांद्याचा रस हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

मित्रांनो आपल्या रोजच्या वापरातला कांदा सुद्धा केसांसाठी खूप फायदेशीर आहे बरं का! कांद्याचा रस हा केसांवर (Hair Growth) एखाद्या जादूसारखा काम करतो.एकदम रॉकेट सारखा म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात.

तुम्हाला जर मोठे केस आणि लॅम्ब लचक हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम आणि सोपं उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑईल मध्ये सुद्धा मिक्स करून अप्लाय करू शकता.

बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा. 45 मिनिटांनी केस धुवून घ्या. 

5)रोजमेरी तेल हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

रोझमेरी ऑइलमध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म टाळूशी संबंधित खाज सुटणे आणि फुगणे यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

केसांच्या (Hair Growth) वाढीसाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. रोझमेरी तेलाचे काही थेंब टाळूवर लावा. पाच ते दहा मिनिटे मसाज करा आणि नंतर लगेच शॅम्पूने धुवा. चार आठवड्यांत तुम्हाला बदल दिसून येईल.

6)अंड्याच्या वापर हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

मित्रांनो अंड्याचा वापर देखील केसांना (Hair Growth) मालिश करण्यासाठी केला जातो,अंड्यातील पिवळ्या भागात प्रथिने,जीवनसत्व क व अ हे भरपूर प्रमाणात असतात.आणि त्याचा नक्कीच फायदा होतो

अंड्यातील पांढरा बलक काढून व्यवस्थित रित्या मिक्स करून केसांच्या मुळांशी लावून दहा मिनिटांनंतर स्वच्छ शाम्पूने केस धुतल्यास केस मुलायम होतात.

7)कोरफड हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

मित्रांनो कोरफड हे केस लांब (Hair Growth)आणि दाट करण्यासाठी एक अद्भुत औषधी वनस्पती आहे. जीवनसत्त्वे ए, सी, ई व्यतिरिक्त, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. याने सुधा फायदा होतो .

Researchgate.net मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार  कोरफडीच्या पानांमध्ये जेलसारखा पदार्थ असतो, जो टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो. केसांची वाढ होण्यासाठी एलोवेरा जेल किंवा जेल उत्पादने निवडा आणि शॅम्पू करण्यापूर्वी आपल्या टाळूची मालिश करा. हे नियमितपणे केल्याने, तुम्हाला तुमच्या टाळूवर कोरफडीचा चांगला प्रभाव दिसून येईल.

8)चहा पावडर हे एक घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी

दैनंदिन जीवनात वापरले जाणारे चहापावडर हे देखील आपली केस (Hair Growth) नरम, मुलायम करून त्यांची वाढ करण्यासाठी एक वेगळीच भूमिका बजावते.

एक चमचा चहा पावडर पाण्यात टाकून ते पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावे व नंतर थंड झाल्यावर चाळणीने चहा पावडर वेगळे करून गळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसांना चकाकी येते.

नोट : कृपया वर देण्यात आलेले कोणतेही केस वाढण्यासाठी घरगुती उपाय केल्यास आपणास केस अथवा शरीराच्या इतर भागात काही साइड एफफेक्टस जसे एलर्जि वैगरे दिसत असेल तर तत्काल तो उपाय करणे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :मोबाईल चोरीला गेल्यास फक्त एवढेच करा मोबाइल तुम्हाला लगेच भेटेल )

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : तुमचा Smartphone स्लो चालतोय या खास टिप्स वापरुन स्पीड वाढवा – tech news)

धन्यवाद !!

Leave a Comment