उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर | Income Certificate Online Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Income Certificate Online Maharashtra म्हणजे उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास उत्पन्नाची अट निश्चित करण्यात येते. सरकारकडून विविध योजनांचा लाभ नागरिकांसांठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून देण्यात येते.

शिक्षण घेताना देखील विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीयाचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो.  हा दाखला जवळच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरुन काढता येतो.

उत्पन्नाचा दाखला कुठे मिळतो?

उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकत प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतु केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते.

तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईट भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

उत्पन्न प्रमाणपत्राचा उपयोग पुढील प्रमाणे

मित्रांनो उत्पन्नाचा दाखला विविध कारणांसाठी उपयुक्त आहे जसे की शाळांमध्ये प्रवेश मिळवणे, शिक्षणासाठी कर्ज मिळवणे, तुमचे उत्पन्न आयकरातून वाचवणे, तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी इतर विविध प्रमाणपत्रे मिळवणे. Income Certificate Online Maharashtra

महाराष्ट्रात उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

Proof of Identity (Any -1)

 1. PAN Card
 2. Passport
 3. RSBY Card
 4. Aadhaar Card
 5. Voter ID Card
 6. MNREGA Job Card
 7. Driving License
 8. Photo of Applicant
 9. Identity cards issued by Govt or Semi Govt organizations

Proof of Address (Any -1)

 1. PAN Card
 2. Passport
 3. RSBY Card
 4. Aadhaar Card
 5. Voter ID Card
 6. MNREGA Job Card
 7. Driving License
 8. Photo of Applicant
 9. Identity cards issued by Govt or Semi Govt organizations

उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं पुढील प्रमाणे

मित्रांनो प्राप्तिकर परतावा भरल्याचं प्रमाणपत्र, मंडल अधिकार्‍याचा तपासणी अहवाल, नोकर दारांसाठी फॉर्म नंबर 16, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, अर्जदार शेतकरी असल्यास 7/12 आणि 8 अ चा उतारा . Income Certificate Online Maharashtra

आपले सरकार वरुन अर्ज कसा करायचा? पुढील प्रमाणे

आपले सरकारावर नवीन वापर कर्ता नोंदणी या लिंकनवरून नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तमचं लॉगीन तयार करुन घ्याव. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा.

तिथून पुढे उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकतीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणार्‍या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणे ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी. अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.

सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Income Certificate Online Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment