Land Record | आपल्या जमिनीचे 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन मोबाइल वर्ण पाहा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Land Record म्हणजे आपल्या जमिनीचे 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन मोबाइल वर्ण पाहा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

सध्याच्या नव्या युगा मध्ये एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनी संदर्भाचा सगळी माहीत असणे आवश्यक आहे त्या शिवाय काही होत नाही अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते.’

मित्रांनो त्यामुळे खरेदी पूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असणं अवस्क आहे. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात.

पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्व इतिहास मिळवण्यात अडचणी येत असत. ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. 

आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे.  Land Record

यामध्ये मध्ये पुढील जिले आहेत अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

जुने अभिलेख कसे पाहायचे पुढील प्रमाणे

मित्रांनो जसा आम्ही सांगतोय तसाच स्टेप फोल्ल्वो करा Land Record मग तुम्हाला चेक करता यईल.

  • जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.
  • या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
  • तुम्ही जर आधीच या वेबसाईट नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पास वर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापर कर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
  • यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.
  • फॉर्म
  • त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचा आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचा आहे.
  • यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
  • वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
  • यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.
  • त्यानंतर Pin code टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
  • पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.
  • ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन – आयडी तयार करायचा आहे.
  • तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पास वर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्याचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्याचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.
  • सगळ्यात शेवटी सब मिट बटन दाबायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापर कर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉग इन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेला यूझरनेम आणि पास वर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचा आहे.
  • आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.
  • यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. Land Record
  • पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
  • आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
  • त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
  • फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरची फाइल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982 चं फेरफार पत्रक ओपन होईल.
  • या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.
  • त्यानंतर 1982 सालाच फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.
  • याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Land Record ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment