घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर मिळतात 20,000 रुपये | National family benefit scheme (NBFS) 2023 In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की National family benefit scheme 2023 In Marathi म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2023 काय आहे? त्याची पात्रता आणि अर्ज कसा करायचा? याबद्दल जाणून घेऊयात. त्यासाठी पूर्ण लेख नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2023 | National family benefit scheme (NBFS) 2023 In Marathi

मित्रांनो, जेव्हा घरातील कमावत्या व्यक्ति चे निधन होते तेव्हा त्या कुटुंबाचे आर्थिक आणि मानसिक दोन्ही बाजू खचून जातात. घरातील कर्त्या पुरुष किंवा महिलाचे निधन झाले तर घरावर आर्थिक संकट येते. National family benefit scheme 2023 In Marathi


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना” (rashtriy kutumb labh yojana) ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत घरातील कर्त्या व्यक्ति चे निधन झाले तर केंद्र सरकार कडून अशा कुटुंबांना 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2023 पात्रता | Eligibility Of National family benefit scheme in Marathi

  1. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी लागू आहे.
  2. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना केवळ 18 ते 60 वयोगटातील पुरुष प्रमुख असलेल्या कुटुंबांनाच दिली जाईल.
  3. संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (15,000 किंवा त्यापेक्षा कमी ) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो.
  4. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
  5. जर कुटुंब शहरी भागात राहत असेल, तर संपूर्ण कुटुंबाचे एकूण उत्पन्न 56,000 INR पेक्षा जास्त नसावे आणि ग्रामीण भागातील प्रगत कुटुंबाचे उत्पन्न 46,000 INR पेक्षा जास्त नसावे.
  6. कुटुंबासाठीचे कौटुंबिक भत्ते (पती / पत्नी, अल्पवयीन मुले, अविवाहित मुलगी आणि आश्रित पालकांसह) मृत व्यक्तीला सरकारी अधिकाऱ्याने केलेल्या स्थानिक चौकशीनंतर दिले जातील.

अर्ज कुठे करायचा | Where to apply Application of NFBS in Marathi

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकता.

आवश्यक कागदपत्रे | Required documents for NFBS

  1. आधार कार्ड / पॅन कार्ड
  2. रहिवाशी दाखला
  3. कुटुंब कर्त्याचे मृत्यू प्रमाणपत्र
  4. पासपोर्ट फोटो
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. बँक अकाऊंट
  7. अर्जदाराची स्व-पुष्टीकरण कागदपत्रे

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो?

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत कुटुंब प्रमुखच्या मृत्यूनंतर लाभयार्थ्याला 20,000 रुपये आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते.

अश्या प्रकारे आपण या लेखामध्ये National family benefit scheme (NBFS) 2023 In Marathi याबद्दल माहिती घेतली. तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर कमेन्ट मध्ये विचारू शकता.

धन्यवाद!!!


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.

या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.

Leave a Comment