Pik Vima 2023 | शेतकर्‍यासाठी आनंदाची बातमी शेतकर्‍यांना मिळणार फक्त १ रूपयामध्ये पिक विमा, लगेच करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pik Vima 2023 म्हणजे या शेतकर्‍यासाठी आनंदाची बातमी शेतकर्‍यांना मिळणार फक्त १ रूपयामध्ये पिक विमा, लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

Pik Vima 2023 Maharashtra

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पी य अधिवेशनात शेतकर्‍यांना १ रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. ते विमा ल अर्ज कस करायचा त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मात्र, त्याचा शासन निर्णय काढला नव्हता. त्यावर विरोधी पक्षांनी सरकारावर टिका केल्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय काढला. आता त्याचा फायदा शेतकर्‍याला नक्की होईल. Pik Vima 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्यामुळे आता शेतकर्‍यांना फक्त १ रूपयामध्ये पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा भरण्याची घोषणा केली होती.

परंतु कृषी विभागाकडून आदेश न काढल्याने घोषणेची अंमलबजावणी होत नव्हती.

पण मित्रांनो विधानपरिषदेचे विरोध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एका ट्विटद्वारे सरकारवर हल्ला चढवला. ते ट्विट काय आहे वाचा खाली सविस्तर दिलोय

खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. हंगामातील अनेक पिकांच्या विम्याची रक्कम भरण्याची मुदत संपली आहे.

तर काही पिकांची मुदत संपत आली असतानाही अजून शासन निर्णय काढला नाही.

त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शासन निर्णय काढावा, अशी मागणी केली होती.आणि ती मानेही झाली

मित्रांनो त्यानंतर आता कृषी विभागाने सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू करण्याचा आदेश जारी केला आहे.

त्यानुसार शेतकर्‍यांना फक्त १ रुपयामध्ये ५ प्रकारच्या नुकसानाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.  Pik Vima 2023

तसेच केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री फसल बिमा योजनेंतर्गत विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के हिस्सा द्यावा लागतो.

पण आता सर्वसमावेशक पीक विमा योजनेत शेतकरी हिश्श्याचा भार राज्य सरकार उचलणार आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना फक्त १ रुपया भरून विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.त्याचा फायदा शेतकर्‍याला नक्की होईल अस दिसून येत आहे.

आणि मित्रांनो या पीक विमा योजनेच्या अंमल बजावणीची जबाबदारी राज्य कृषी आयुक्तांची असेल.

या योजनेत संबंधित शेतकर्‍याला आपले सरकार केंद्र, बॅंक किंवा पीक विमा पोर्टलच्या माध्यमातून सहभागी होता येईल. ही योजना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत राबविली जाणार आहे.हे मात्र खरं आहे

या पीक योजनेचा लाभ कधी मिळेल वाचा सविस्तर

  • प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
  • हंगाम सुरू असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले पिकांचे नुकसान
  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी उत्पन्नात घट (पावसातील खंड, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, पूर, भू स्खलन)
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
  • नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात् नुकसान

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Pik Vima 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment