Register heirs 2023 | वारस नोंद करायचीचं का? तलाठ्याशिवाय करा घरबसल्या करा अर्ज मोबाइल वर्ण 10 मिनिटा मध्ये

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Register heirs 2023 म्हणजे वारस नोंद करायचीचं का? तलाठ्याशिवाय करा घरबसल्या करा अर्ज मोबाइल वर्ण 10 मिनिटा मध्ये  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Register heirs 2023

मित्रांनो शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमि‍नीवर वारस पहिले नाव नोंद करावी लागते.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्यांची सात बारावर नोंद होईल.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


अस सरकार च नियम आहेत त्या आम्ही सांगतो की तुम्ही पहिले पूर्ण पोस्ट वाचून मग ठरवा. माहिती नीट समजली नाही तर प्रॉब्लेम येतील त्या साठी सांगात असतो आम्ही.Register heirs 2023 

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली विकसित केली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. ते पण आपल्या मोबाइल वर्ण

सातबारा उतार्‍यावर बोजा चढविणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे, ई-करार करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो. अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली, हे देखील तपासता येते.

दरम्यान, तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर १७ व्या दिवशी तो मंडलाधिकारी यांच्याकडे जातो. १८ व्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो. त्यासंबंधीचा अधिकार मंडलाधिकाऱ्यांना आहे.

मित्रांनो एका कागदावर शपथ पत्र लिहून ते अपलोड करावे. त्यात मृत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे, पत्ते नमूद करावेत. सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर ‘फाइल अपलोड’ झाल्याचा मेसेज येईल.

त्यानंतर एक स्वयंघोषणपत्र दिसेल. या पत्राखाली ‘सहमत’ (Agree) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल. तेथे त्या अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी मंडलाधिकाऱ्यांकडे जातो. १८व्या दिवशी सात-बारावर वारसांची नावे लागतील.Register heirs 2023 

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली विकसित केली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

त्या मध्ये पुढील प्रमाणे गोष्टीं असतील

सातबारा उतार्‍यावर बोजा चढविणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे, ई-करार करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो. 

वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज पुढील प्रमाणे

१) सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in येथे सर्च करून ‘७/१२ दुरूस्तीसाठी ई- हक्क प्रणाली’ अशी सूचना असते. त्या खालील https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करावे.

२) ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पेज उघडल्यावर ‘Proceed to login’वर क्लिक करून आधी स्वत:चे ऑनलाईन खाते उघडा. त्यासाठी ‘Create new user’वर क्लिक करून ‘New User Sign Up’वर सुरवातीला स्वत:ची माहिती भरावी. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून ‘check availability’ पर्यायावर क्लिक करून पास वर्ड टाका. मग Security Questionsमधील एका प्रश्नाचे उत्तर द्या.

३) त्यानंतर मोबाईल, पॅनकार्ड नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर ‘Select City’मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Detailsमध्ये घराची माहिती टाका. शेवटी कॅप्चा टाका आणि ‘सेव्ह’ म्हणा. त्यानंतर पेज खाली एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल. त्यानंतर ‘Back’ बटणावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.

४) नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पास वर्ड पुन्हा टाका. तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर ‘Details’चे पेज उघडेल. त्या ठिकाणच्या पर्यायावरील ‘७/१२ mutations’वर क्लिक करा. Register heirs 2023 

५) ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असल्यास ‘User is Bank’वर क्लिक करा. एकदा यूझरचा प्रकार निवडल्यावर ‘Process’वर क्लिक करा, ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्काचे पेज ओपन होईल. तेथील माहिती भरल्यावर ‘तलाठ्यांकडे ज्या फेरफारासाठी अर्ज करायचा तो वारस नोंद पर्याय निवडा. त्यानंतर वारस फेरफार अर्ज उघडेल.

६) सुरवातीला अर्जदाराची माहिती भरून ‘पुढे जा ‘वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेजखालील ‘ओके’ बटणावर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारा वरील खाते क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा ‘वर क्लिक करून मृताचे नाव निवडा.

७) त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर ‘समाविष्ट करा ‘वर क्लिक करून खाते धारकाच्या जमिनीची माहिती तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाही पैकी योग्य पर्याय निवडून ‘वारसांची नावे भरा ‘वर क्लिक करा. Register heirs 2023

८) वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा आणि मग जन्म तारीख टाका. वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा. त्यानंतर पुढील माहिती भरा.

९) पुढे मृतासोबतचे नाते निवडा व शेवटी ‘साठवा’ (सेव्ह) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर दुसर्‍या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील ‘पुढील वारस ‘वर क्लिक करा आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा व ‘साठवा ‘वर क्लिक करा.

१०) वारसांची नावे भरल्यावर ‘पुढे जा ‘वर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्याप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही लागतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Register heirs 2023  ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment