Land Record 2023 | 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाइल वर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Land Record 2023 म्हणजे तुम्ही 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाइल वर त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

सध्याच्या नव्या युगा मध्ये एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा सगळी माहीत असणे आवश्यक आहे त्या शिवाय काही होत नाही अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते.

मित्रांनो त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असण अवस्क आहे. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात.

पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत. ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. Land Record 2023

मित्रांनो आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे.संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे.

आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने आम्ही सांगितल्या प्रमाणे फॉलो करा.


१८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा


मित्रांनो महाराष्ट्र सरकार ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे.

सध्या या वेबसाईटवर 14 लाख 22 हजार 958 दस्तऐवज डाउनलोड केलेले असून वेबसाईटला व्हिजिट केलेल्यांची संख्या 5 लाख 17 हजार 196 आहे.

माहिती मिळवण्यासाठी आपल्याला aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

त्यात आपल्याला “लॉग इन आयडी’ आणि “पासवर्ड’ बटणांच्या खाली “मदत’ या बटणावरून वेबसाइटद्वारे डाउनलोड करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत?

माहिती शोधासाठी नवीन लॉगइन कसे तयार करावे? पासवर्ड कसा बदलावा? कोणत्या पॅरामीटर्सवर / मापदंडावर दस्तऐवज शोधणे शक्य आहे? मूलभूत शोध आणि प्रगत शोधमध्ये काय फरक आहे?

मूलभूत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? प्रगत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? “पुन्हा योजना’ बटण कधी वापरावे? आदींसंबंधीची मार्गदर्शक सूचना व आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

मित्रांनो पुढे दिलेल्या प्रमाणे स्टेप फोल्ल्वो करा

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. Land Record 2023

• या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
• त्यात उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा.
• त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व ‘मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून साईटवर जाऊ शकता.
• नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्लिक करा.
• त्यानंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.
• त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.
• यानंतर लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा. निर्देशानुसार पासवर्ड टाका.
• त्यानंतर एका चौकटीतील कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर द्या.
• त्यानंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा. मग शेवटी सबमिट बटण दाबा.
• त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.
• आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.

असा पाहा फेरफार उतारा मोबाइल वर्ण

• वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा,
आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
• यानंतर गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.
• यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
• फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.
• त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करा.
• त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.
• इथं” तुमच्या फाइलची सद्य: स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.
• त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्लिक केलं की फेरफार पत्रक ओपन होईल. Land Record 2023


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment