आमदारांचा पगार किती असतो त्यांना पेन्शन किती मिळते? | MLA salary news 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की MLA salary news 2023 म्हणजे आमदारांचा पगार किती असतो त्यांना पेन्शन किती मिळते? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आपल्या सारख्या सामान्य माणसाला हे माहिती नसत कधीही की आपल्या राज्य च्या  आमदारांचा पगार किती असतो व त्यांना सरकार पेन्शन किती देते व त्यांना कोण ते कोण ते सुविधा मिळतात चला तर मग बघूया आपण ह्या पोस्ट मधून नक्की पोस्ट आवडली तर आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो आमदारांना पेन्शन द्यायला सरकाराकडे खूप पैसे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांना पेन्शन दिली जाते त्यावेळची राज्य सरकारच्या तिजोरीवर भार कमी पडत नाही.

फक्त सामान्य माणसाला पेन्शन देतानाच सरकार आर्थिक कारण पुढे करतं.प्रत्येक नैसर्गिक, आरोग्य आपत्तित आम्ही जीवाची पूर्वा न करता काम करत असतो. मग आम्हाला पेन्शन देताना सरकार हात आखडता का घेत? अशी प्रतिक्रिया सरकारी कर्मचार्‍यांनी आंदोलना दरम्यान बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील सुमारे 18 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. परंतु जुनी पेन्शन योजना राज्यात पुन्हा लागू केली तर राज्यावरील आर्थिक बोजा प्रचंड वाढेल अशी सरकारची भूमिका आहे. सरकारच्या याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संपकरी कर्मचाऱ्यांनी आता थेट आमदारांच्या पेन्शनवर बोट ठेवलं आहे.

मित्रांनो सरकारला आमदारांना एवढी पेन्शन देणं परवडतं पण आम्हाला पेन्शन द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे.यामुळे आमदारांना नेमकी किती पेन्शन मिळते? सर्वाधिक पेन्शन कोणत्या माजी आमदारांना मिळते? आमदारांचा त्यांचा पगार किती? आमदारांना किती भत्ता मिळतो आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घेऊया. चला तर मग

सरकारला आमदारांना एवढी पेन्शन देणं परवडतं पण आम्हाला पेन्शन द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे.यामुळे आमदारांना नेमकी किती पेन्शन मिळते? सर्वाधिक पेन्शन कोणत्या माजी आमदारांना मिळते? आमदारांचा त्यांचा पगार किती? आमदारांना किती भत्ता मिळतो आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घेऊया. चला तर मग बघूया तुम्हाला योग वाटत का बघा एवढी पगार वगैरे कोममेंट्स करून नक्की सांगा .  

MLA salary news 2023

मित्रांनो विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांना म्हणजेच प्रत्येक आमदाराला नियमानुसार पगार, भत्ता, सुविधा, सवलती देणं ठरलेला आहे.यासंदर्भात विधिमंडळातील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. शिवाय, इतरही अनेक सोयी सुविधा आमदारांना दिल्या जातात.

आमदारांना काही सुविधांसाठी भत्ता सुद्धा मंजूर केला जातो. त्यानुसार,

  • टेलीफोन – 8 हजार रुपये भत्ता
  • स्टेशनरी – 10 हजार रुपये भत्ता
  • संगणक – 10 हजार रुपये भत्ता

त्यामुळे एका आमदाराला महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये एका आमदाराला भत्ता किंवा पगार मिळतो. याव्यतिरिक्त अधिवेशना दरम्यान प्रत्येक आमदाराला दर दिवशी काही विशिष्ट रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. यानुसार प्रत्येक आमदाराला दर दिवशी 2 हजार रुपये भत्ता मिळतो. तर आमदारांच्या पी एच्या पगारासाठी 25 हजार रुपये मंजूर झालेले आहेत.

मित्रांनो राज्यांतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला 15 हजार रुपये मिळतात. तसंच महाराष्ट्राबाहेर जायचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र 15 हजार रुपये मिळतात. तर आमदार विमानतळाहून राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात.BEST, MSRTC आणि MTDC मध्ये मोफत प्रवासाची सुविधा.

निवृत्ती आमदाराला वेतन किती मिळते ?

मित्रांनो राज्यात प्रत्येक माजी आमदाराला निवृत्ती वेतन मिळते. आमदाराचे निधन झाले असल्यास त्यांच्या कुटुंबालाही निवृत्ती वेतन मिळते.दोन्ही पैकी कोणत्याही एका सभागृहात शपथ घेतलेल्या माजी आमदाराला निवृत्ती वेतन मंजूर होते.माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले आहे. तर एकाहून अधिक टर्म आमदारकी असेल तर 50 हजार रुपयांमध्ये प्रत्येक टर्मसाठी 2 हजार रुपये वाढत जातात.म्हणजे एखादा आमदार एक वेळ आमदार राहिला असल्यास त्या माजी आमदाराला 50 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते.

तर दोन टर्म आमदार राहिलेल्या माजी आमदाराला 52 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते, अशी माहिती विधिमंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.यापूर्वी आमदारांचं निवृत्ती वेतन 40 हजार रुपये होतं. 2016 मध्ये निवृत्ती वेतन 10 हजार रूपयांनी वाढवण्यात आलं. आमदाराच्या निधनानंतर – पती किंवा पत्नीला 40 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. तसंच रेल्वे प्रवासाचीही सुविधा मिळते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला MLA salary news 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us On WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us On Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment