Ramdara temple information in Marathi | रामदरा शिवालय मंदिरा बदल माहिती मराठी मध्ये

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ramdara temple information in Marathi म्हणजे रामदरा शिवालय मंदिरा बदल माहिती मराठी मध्ये त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो शहरांमधील कॉंक्रिटच्या जंगलात घुसमटलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी वीकएंडला वर्दळीपासून दूर जाण्याची निकड अनेकांना भासते. जस की एकांत मिळेल, निसर्गाचं सान्निध्य अनुभवता येईल, ही त्या मागची मोठी भावना असते.

त्या पैके अशी एक जागा पुणे शहराजवळच आहे, हे अनेकांना कदाचित माहीत नसेल. पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटरवर असं एक स्थळ आहे. त्याचं नाव रामदरा. अगदी निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. 

प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं, 

मित्रांनो तीर्थ क्षेत्र रामदरा शिवा लयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदी बाबा यांनी गेल्या साठ वर्षांपूर्वी हे तीर्थ क्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
Ramdara temple information in Marathi

सुरवातीला हे स्थान जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कुणी जायचे नाही. धुंदी बाबांच्या वास्तव्याने यथे भाविकाचे येणे जाणे चालू झाले. धुंदी बाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देणगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले. या मंदिरात शिवलिंग व श्री रामाची स्थापना केली. ट्रस्टची स्थापना करून देवस्थानाच्या नावावर ३५ एकर शेती घेऊन येथे शेतीच उत्पन्न  घेऊन भाविकाच्या नित्य प्रसादाची सोय केली आहे.

नंदी मंडप , २४ खांबाचं सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात अनेक  शिल्प चित्र , यज्ञकुंड व धुंदी बाबांची संगमरवरी मुर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग , राम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती आहेत व दत्त महाराजांची स्थापना केली आहे.

मित्रांनो या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली. त्यानंतर थेट 1970 मध्ये मंदिराचा कायापलट करण्यात आला. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मूळचं महादेवाचं मंदिर. तथापि, सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम-लक्ष्मण आणि सीता, तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मंदिराच्या कायापलटामागे श्री देव पुरी महाराज ऊर्फ धुंदी बाबांचा फार मोठा सहभाग होता. मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही इथं राबता असतो.

मंदिराभोवती सुंदर तळ असल्याने परिसर विलोभनीय झाला आहे. एकंदर हा परिसर एवढा सुंदर व शांत आहे की तुमच्या मनाला अध्यात्मिक शांती मिळते. थेउरच्या गणपतीाला जाताना किंवा येताना रामदरा या ठिकाणाला भेट देता येते.

मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत. भगवान शंकर तांडवनृत्य करत असलेलेही एक शिल्प आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे. पुणे-सोलापूर महामार्गानं अवघ्या एका तासात या ठिकाणी पोचता येतं. मंदिर परिसरात स्थानिकांतर्फे चालवण्यात येणाऱ्या उपाहारगृहात चांगले आणि रुचकर पदार्थ मिळतात. शाकाहारी जेवणाचीही इथं सोय होऊ शकते. 

रामदरा शिवालय मंदिराला कस जयाचं  

मित्रांनो पुण्यापासून 26 किलोमीटर वर. पुण्याहून सोलापूर महामार्गानं लोणी काळभोर गावातून उजवीकडं एक छोटा रस्ता गेला आहे. या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर. स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि पीएमपीएमलच्या बसही मिळू शकतात. बसनं आल्यास रामदऱ्याकडे रिक्षानं जावं लागतं. 
Ramdara temple information in Marathi

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ramdara temple information in Marathi ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

FAQ

Q1.पुण्यात रामदरा कुठे आहे?
पुण्यापासून 26 किलोमीटर वर. पुण्याहून सोलापूर महामार्गानं लोणी काळभोर गावातून उजवीकडं एक छोटा रस्ता गेला आहे. या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर. स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि पीएमपीएमलच्या बसही मिळू शकतात. बसनं आल्यास रामदऱ्याकडे रिक्षानं जावं लागतं. 

Q2.रामदरा मंदिर कधी उघडणार?
Ramdara Mandir is open: Sun – Sat 5:00 AM – 6:00 PM


Important LinksClick Here 👇
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment