Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana | मोदी सरकारचा मोठा निर्णय पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana: पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य या योजनेमध्ये ८१.३५ कोटी व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

आपल्या भारतातील गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने खूप मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय आहे आता पुढील सलग ५ वर्षे नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे.

आणि पीएमजीकेएवाय या योजनेअंतर्गत केंद्र सरकार अन्न अनुदानावर पुढील ५ वर्षांत ११.८० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.त्या मुळे आता पुढील ५ वर्षे नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या देशातील गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, किफायतशीरता आणि सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी पीएमजीकेएवायअंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवणे पुढील पाच वर्षे सुरू ठेवले जाणार आहे.

आता त्या मुळे नक्कीच गरीब लोकांना ह्याचा फायदा होईल हे मात्र नक्की.

भारत देशात कोरोनाकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. हे तर आपल्याला माहितीच आहे आणि आता नागरिकांची ही अडचण लक्षात घेता,

आता ही पीएमजीकेएवाय ही योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजे ह्या योजना मार्फत प्रत्येक गरजू व्यक्तींना ५ किलो अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते.

आणि ही योजना पुढील ५ वर्षांसाठी वाढवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही पीएमजीकेएवाय अंतर्गत १ जानेवारी २०२४ पासून पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्याची तरतूद आहे. आणि या योजनेसाठी राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घकालीन वचनबद्धता नागरिकांना दिसत आहे.

आणि आता ह्या मोफत अन्नधान्याच्या तरतुदीमुळे समाजातील बाधित वर्गाच्या कोणत्याही आर्थिक अडथळ्याचे शाश्वत रीतीने शमन होईल ही अपेक्ष्य आहे आणि लाभार्थ्यांना शून्य खर्चासह बरेच काळ ही किंमत धोरणाची हमी राहील.

या योजना मध्ये लाभार्थ्यांचे कल्याण नक्की होईल अस लक्षात घेऊन देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्पित वृत्ती आणि वचनबद्धता दर्शवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे असं म्हटलं जातंय.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana benefits

1.PMGKAY रेशनकार्ड असलेल्या प्रत्येक कुटुंबाला 5 किलो धान्य मोफत आणि सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे आधीच दिलेले 5 किलो अनुदानित अन्नधान्य प्रदान करते.

2.पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, दिल्ली आणि गुजरात या 6 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना गहू वाटप करण्यात आला आहे आणि उर्वरित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांदूळ देण्यात आला आहे.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Eligibility

1.अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब श्रेणीतील कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.

2.PHH ची ओळख राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी त्यांच्याद्वारे विकसित निशांनुसार केली जाईल. केंद्र विहित यांनी केलेल्या निशांनुसार AAY कुटुंबांची ओळख राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी केली आहे:

3.विधवा किंवा अशक्त आजारी व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या नेतृत्वाखालील कुटुंबे ज्यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही निश्चित साधन किंवा सामाजिक आधार नाही.

4.विधवा किंवा अशक्त आजारी व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती किंवा अविवाहित महिला किंवा अविवाहित पुरुष ज्यांना कौटुंबिक किंवा सामाजिक आधार नाही किंवा उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही.

5. सर्व आदिम आदिवासी घरे.

6.भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर/कारागीर जसे की कुंभार, चर्मकार, विणकर, लोहार, सुतार, झोपडपट्टीत राहणारे आणि पोर्टर्स, कुली, रिक्षाचालक, हातगाडी यांसारख्या अनौपचारिक क्षेत्रात दररोज आपली उपजीविका करणारे व्यक्ती. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात फळे आणि फुलांचे विक्रेते, सर्पविक्रेते, चिंध्या वेचणारे, मोची, निराधार आणि इतर तत्सम श्रेणी.

6.एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींचे दारिद्र्यरेषेखालील सर्व पात्र कुटुंबे.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Documents Required

  • शिधापत्रिका
  • आधार कार्ड (जर रेशन कार्डसह सीड असेल)

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Application Process

इच्छुक व्यक्तींनी रेशनकार्डसह जवळच्या रासन भाव दुकानाला भेट द्यावी आणि आपले काम करून घावे.

1.लाभार्थी त्यांचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक देशभरातील कोणत्याही रास्त भाव दुकानातील विक्रेत्याला उद्धृत करू शकतात.

2.लाभार्थी त्यांच्या बोटांचे ठसे किंवा बुबुळ-आधारित ओळख वापरून आधार प्रमाणीकरण करू शकतात.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment