Marriage Certificate Online Process | विवाह प्रमाणपत्र बनवण्याचे कसे? जाणून घ्या एका क्लिकवर

Marriage Certificate Online Process: आपल्या लग्नाचा प्रमाणपत्र बनवण्याचे कसे? यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वाचा सविस्तर

Marriage Certificate Online Process

आपल्या देशात सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि काहीचे लग्न हे झाले पण, लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबाचे असते असे म्हटले जाते.

आणि आता या नात्याला आपण धार्मिक विधीनी एकत्रित बांधतो. आणि याला कायदेशीररित्या देखील मान्यता देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

भारतात लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुला-मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्न झाल्यानंतर नावापासून ते इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर अनेक गोष्टी बदलतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जसे की मुलींचं आडनाव आणि त्यातील महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे विवाह प्रमाणपत्र. आणि विवाह प्रमाणपत्र बनवण्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत.

आता तुम्ही म्हणाल की हे बनवण्याचे कसे? यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे? आणि ऑनलाइन प्रोसेस काय? जाणून घ्या सविस्तर माहिती खाली दिली आहे.

सध्याच्या काळात लग्नाचा दाखला मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाला कायदेशीररित्या मान्यता मिळणे. कारण विवाह प्रमाणपत्राशिवाय मुलगा आणि मुलगी कायदेशीर पती-पत्नी नाहीत.

हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कायदेशीररित्या त्या नात्याला मान्यता मिळते. Marriage Certificate Online Process

आणि याच्या मदतीने तुम्हाला अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकतो.याशिवाय विवाह किंवा घटस्फोटच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास विवाह प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते.

आता हे तयार करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करु शकता. पण ते कसे कराल? जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

Benefits of Marriage Certificate | विवाह प्रमाणपत्राचे फायदे

  1. जर तुम्हा पती-पत्नी व्हिसावर परदेशात जायचे असल्यास किंवा दुसऱ्या देशात राहण्यासाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला वैध विवाह प्रमाणपत्र प्रदान करणे खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला एकत्र मालमत्ता विकत घ्यायची असेल आणि ती संयुक्त मालकीखाली नोंदवायची असेल, तर विवाह प्रमाणपत्र हे अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे.
  2. आपल्या भारतातील तसेच भारताबाहेरील देशांतील परदेशी दूतावास पारंपारिक विवाहांना मान्यता देत नाहीत, त्यामुळे विवाह सिद्ध करण्यासाठी विवाह प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  3. आपल्या पती/पत्नीला मालमत्तेचा वारस दिल्यास कायदेशीर कार्यवाही करणे देखील सोपे आहे.
  4. ठेवीदार किंवा विमाकर्त्याचे कोणत्याही नामनिर्देशित व्यक्तीशिवाय निधन झाल्यास, ते पती / पत्नीला कौटुंबिक पेन्शन किंवा बँक ठेवी किंवा जीवन विमा लाभांवर दावा करण्यास सक्षम करते.
  5. जर आपल्या लग्नानंतर नाव बदलणे किंवा पासपोर्टसाठी अर्ज करणे किंवा बँक खाते उघडणे आवश्यक असल्यास प्रमाणपत्राची आवश्यकता लागते .
  6. हे पती किंवा पत्नीला लग्नानंतर त्यांच्या जोडीदाराने सोडून जाण्यापासून देखील समर्थन देते.
  7. त्याच बरोबर पहिले लग्न मोडल्यानंतर, एखादी व्यक्ती दुसऱ्यांदा वैवाहिक युतीमध्ये प्रवेश करू शकते.
  8. आणि आपल्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी किंवा कायदेशीर विभक्त होण्याच्या बाबतीत मुलांच्या ताब्यात घेण्यासाठी, कोर्टाला कौटुंबिक न्यायालयात लग्नाचे प्रमाणपत्र सादर करणे खूप आवश्यक आहे.
  9. मार्शल डिस्प्युट्समध्ये यापैकी एकानेही प्रमाणपत्र भक्कम आणि वैध पुरावा म्हणून मानले जाते.

ऑनलाइन अर्ज असा करा ?

  • पहिले तर विवाह नोंदणीसाठी तुम्ही ऑनलाइन नोंदणीचा लाभ घेऊ शकता ते पण आपल्या मोबाइल वर्ण .
  • सर्वात पहिले तुम्हाला यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या साइटला (Site) भेट देऊ शकता.
  • त्या नंतर साइन अप करुन पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल.
  • तुम्हाला मोबाइल नंबर विचारला जाईल, तो भरल्यानंतर पासवर्ड टाका.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे विचारली जातील.
  • वधू-वरांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, लग्नाचा फोटो, मोबाइल नंबर, ओळखपत्र, जन्मतारीख, आधार कार्ड, १० वी मार्कशीट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे लागतील.
  • मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर तपशील पाठवा.
  • वेबसाइटवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर इतर गोष्टींसाठी सरकारी कार्यालयात भेट देऊ शकता.

अश्या पद्धतीने तुम्ही ऑनलाइन लग्नाचा प्रमाणपत्र बनवू शकता.ही माहिती आवडली असेल तर आपल्या लग्न झालेल्या मित्राला नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment