मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023 आता महिलांना 6000 रुपये मिळणार केंद्र सरकारकडून लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023
मित्रांनो आता केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या मुलानंतर 5000 रुपये तर दुसऱ्या मुलीनंतर 6000 रुपये देत आहे.
हे मात्र नक्की आणि माता आणि बालमृत्यू कमी करण्याबरोबरच भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मातृ वंदना योजना राबविली जाते.
आणि आता आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात, तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत हे मात्र नक्की , Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023
आणि मित्रांनो सुरुवातीला तीन टप्प्यात योजनेची रक्कम थेट खात्यात जमा केली जात होती. आता दोन टप्प्यातच पाच हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी तीन टप्प्यात तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर योजनेचा लाभ दिला जात होता.
कशी मिळते योजनेची लाभ
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 5000 रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000 रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000 रुपये पात्र महिलेला दिले जातात. Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023
या योजनेसाठी लागणारी पात्रता
- अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.
- गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
- राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.
- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.
- या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
- लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
- लाभार्थी व पतीचे आधार कार्ड.
- लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते.
- गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद.
- शासकीय संस्थेत गरोदर कालावधीत तपासणी.
- बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र.
- लाभार्थीने अटींची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.
- जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक साहाय्य देखील मिळते.
काय लागतील कागदपत्रे पुढील प्रमाणे
- लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र द्यावे लागेल.
- मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
- बँक खाते तपशील
- MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)
- लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र)
- दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत
- तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड. Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023
अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून सविस्तर
मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023 (PMMVY) च्या सर्व अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया येथे दिली आहे.
- सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.
- हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता.
- किंवा wcd.nic.in या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.
- फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.
- अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )